
Gondiya Lampy News ः राजस्थान, पंजाब, गुजरातनंतर महाराष्ट्रातही लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता. पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नानंतर तब्बल २३३ जनावरे बरी झाली असून जिल्हा लवकरच लम्पी स्कीनमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
देशाच्या अनेक राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता. राजस्थान, पंजाब, गुजरातमध्ये लम्पी स्कीनमुळे दगावणाऱ्या जनावरांची संख्या सर्वाधिक होती.
महाराष्ट्रात पाय पसरल्यानंतर या आजाराने सर्वच जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने पशुपालकांची चिंता वाढली होती.
गोंदिया जिल्ह्याच्या सहा तालुक्ंयातील १९ गावांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला होता. २५० जनावरांना याची लागण झाली होती.
पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुवैद्यकांनी गंभीरतेने या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रित केले. उपचार व उपायांच्या बळावर २५० पैकी २३३ जनावरे रिकव्हर होण्यास मदत झाली. जिल्ह्यात दरम्यानच्या काळात बाधित जनावरांपैकी केवळ १५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
आता बाधित जनावरांची संख्या नियंत्रणात असल्याने लवकरच जिल्हा लम्पी स्कीनमुक्त जाहीर होणार आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतिलाल पटले व त्यांच्या पथकाने यासाठी काम केले. गोठा निर्जंतुकीकरण व लसीकरणाला प्रोत्साहन देण्यात आले.
दृष्टिक्षेपात गोंदिया पशुधन
बाधित जनावरे - २५०
उपचाराअंती बरी - २३३
बाधित जनावरे - ०२
मृत जनावरे - १५
लसीकरण - २,९१,६४८
एकूण गायवर्गीय पशुधन - २,९२,६२७
पशुवैद्यकीय कर्मचारी संख्या - २७
सहाय्यक पशुधन अधिकारी - ९
पर्यवेक्षक - ३१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.