Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे २ जनावरांचा मृत्यू

Lumpy Skin Disease : मागील वर्षात लम्पी स्कीन या त्वचा आजाराच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Team Agrowon

Nashik News : मागील वर्षात लम्पी स्कीन या त्वचा आजाराच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत विशेष खबरदारी घेतली होती. मात्र जनजागृती, वेळोवेळी लसीकरण, जनावरांचे बाजार बंद केल्यानंतर हे संकट कमी झाले होते.

मात्र प्रादुर्भावाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील ४० जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ३४ जनावरे बरी झाली. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांत २ जनावरांचा मृत्यू झाला. तर चार जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

गेल्या वर्षी जिल्ह्यात पसरलेल्या लम्पी स्कीन आजाराने ११५ जनावरे दगावली होती. यापैकी १०३ पशुमालकांना २६ लाख ७९ हजार रुपयांची मदत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. उर्वरित प्रस्ताव प्रक्रियेत असल्याने प्रतीक्षेत आहेत. त्या वेळी पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर देऊन या मृत्युदरावर बऱ्यापैकी नियंत्रण आणले होते.

असे असताना लम्पी स्कीन आजाराने जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढता असल्याचे समोर आले आहे. या आजारामुळे मालेगाव व दिंडोरी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू झाला. यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एका शेतकऱ्याच्या सहा महिन्यांच्या वासराला हा आजार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मालेगावातील टाकळी व सिन्नरमधील माळेगाव या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळून आली आहेत. तसेच, आजाराच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. त्यामुळे या आजाराचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता वर्तविण्यात आली.

बाधित क्षेत्र घोषित

मालेगाव तालुक्यात मौजे टाकळी व सिन्नर तालुक्यात मौजे माळेगाव या संसर्ग केंद्रापासून चार किलोमीटर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. १० जुलै रोजी ४ लाख ४७ हजार लसमात्रा आल्या होत्या .हे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ४ ऑगस्ट रोजी पुन्हा ४ लाख ४७ हजार लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर जिल्ह्यात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात होती. त्यानुसार जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, तसेच लक्षणे आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT