Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Vaccination : वासांबे मोहोपाड्यात १९०० जनावरे लसवंत

रसायनी परिसरात गाय, म्हैस वर्गात लाळ्या खुरकूत रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाधित गावांमध्ये नियमित औषधोपचार करण्यात येत आहेत.

Team Agrowon

Animal Care रसायनी परिसरात गाय, म्हैस वर्गात लाळ्या खुरकूत रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाधित गावांमध्ये नियमित औषधोपचार करण्यात येत आहेत. तसेच या रोगाचा प्रसार नजीकच्या गावांमधील जनावरांना होऊ नये, यासाठी लसीकरण (Animal Vaccination) करण्यात येत आहेत.

रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत गावातील जनावरांना मार्च, एप्रिलमध्ये लस दिली आहे. वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, वडगाव, इसांबे, माझगाव आदी ग्रामपंचायत हद्दीतील सहा महिन्यांवरील गाय आणि म्हैस वर्गातील सुमारे १९०० जनावरांना लस दिल्याचे पशुधन अधिकारी यांनी सांगितले.

लाळ आणि खुरकत या रोगांचे २०३० पर्यंत उच्चाटन करणे हे उद्दीष्ट ठेवून मोहीम सुरू केली. एप्रिलअखेरच्या फेरीमध्ये गाय व म्हैस वर्गातील लहान व मोठ्या जनावरांना लाळ खरकूत रोग प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वी गाय, म्हैस व शेळी वर्गास लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा पशुविभागाकडून पशुपालकास अनुदानावर १५०० रुपयांचे मर्यादित चारा, बियाणे मोफत खालापूर पंचायत समिती येथे उपलब्ध आहे.

- रमेश चोपडे, पशुवैद्यकीय अधिकारी, वासांबे मोहोपाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात दबाव कायम, मका दरात मंदी, ढोवळी मिरची आवकेत चढ-उतार, शेपू दरात चढ-उतार, मोसंबी बाजारात नरमाई

Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Shirala Farmers: शिराळा तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी

Power Shortage: अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुष्काळात तेरावा महिना

Loan Waiver List: धुळे जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT