Team Agrowon
जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो. त्यामुळे उत्पादन, आरोग्य, आहार व प्रजनन यांवर विपरीत परिणाम होतो.
शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रण करण्यासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. जनावराचा आहार कमी होऊन तहान-भूक मंद होते.
जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वत:ची यंत्रणा वापरण्यास सुरुवात करते. यामध्ये श्वासोच्छसाचा दर वाढून धाप लागल्यासारखे करते. तोंडाने श्वासोच्छवास करते. श्वासोच्छवास उथळ व जास्त वेगाने होतो. तसेच नाडीचा वेग वाढतो.
जनावरांचे डोळे, लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते. जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.
गाभण गाईमध्ये गर्भ फेकण्याचे प्रमाण वाढते.
जनावराच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते. परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकणे जिकिरीचे होते. त्यातच बाहेरील ऊर्जेचा भार अधिक वाढल्याने जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर याचा परिणाम होतो.