Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Update : ‘लम्पी स्कीन’मुळे १८३ जनावरे दगावली

जिल्ह्यात लम्पी स्कीन प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजपर्यंत एकूण २१२ बाधित गावात तीन हजार ३३१ गाय वर्ग पशुधनाला या आजाराची बाधा झाली आहे.

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन (lumpy Skin Disease) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजपर्यंत एकूण २१२ बाधित गावात तीन हजार ३३१ गाय वर्ग पशुधनाला (Livestock Infection) या आजाराची बाधा झाली आहे. तर १६७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजार १८३ जनावरे बरे झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन (Animal Husbandry) उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.

जिल्ह्यात गाय वर्ग पशुधनाला लम्पी स्कीन आजाराची बाधा होत आहे. या आजाराचा फैलाव दररोज होत असल्याने जनावरांचे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत २१२ बाधित गावांत तीन हजार ३३१ गाय वर्ग पशुधनाला या आजाराची बाधा झाली आहे. तर १६७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजार १८३ जनावरे बरे झाले आहेत.

गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. लम्पीची बाधा झालेल्या ९८७ जनावरांवर औषधोपचार चालू आहे. सद्यःस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

आजपर्यंत चार लाख २४ हजार १२७ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या ७४ वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून, पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. रत्नपारखी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT