Lumpy Skin Disease : पुन्हा एकदा 'लम्पी स्किन'चे थैमान

Team Agrowon

खरीप हंगाम

राज्यात खरीप हंगाम तोंडावर आला असताना जनावरांमध्ये पुन्हा एकदा लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे.

Lumpy Skin Disease | Agrowon

लम्पी स्किन आजार

लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्किन आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

Lumpy Skin Disease | Agrowon

लम्पीची लागण

या वर्षाच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत सुमारे एक हजार २३६ जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १४५ लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Lumpy Skin Disease | Agrowon

लम्पी रोग नियंत्रण

गेल्यावर्षी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जनावरांमध्ये लम्पी रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे समोर आले होते.

Lumpy Skin Disease | Agrowon

लम्पी लसीकरण

लम्पीच्या नियंत्रणासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती.

Lumpy Skin Disease | Agrowon

लम्पी रोगाची लक्षणे

मात्र, आता जनावरांमध्ये पुन्हा एकदा या रोगाची लक्षणे दिसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.

Lumpy Skin Disease | Agrowon

लसीकरणाची मोहिम

गेल्यावर्षी आलेल्या लम्पीच्या पहिल्या लाटेदरम्यान लातूर जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली होती.

Lumpy Skin Disease | Agrowon

जनावरांचा मृत्यू

लसीकरण न झालेल्या जनावरे लम्पीमुळे मृत्युमुखी पडत आहे. ज्यात वासरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

Lumpy Skin Disease | Agrowon
Animal Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....