Bullock cart Race Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : बैलगाडा शर्यतीसाठी ‘लम्पी’चे १०० टक्के लसीकरण आवश्‍यक

सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.

Team Agrowon

Lumpy Skin Vaccination सोलापूर : ज्या गावांमध्ये बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) घेण्यात येणार आहे. त्या गावातील सर्व गोवंशीय जनावरांचे (Bovine Animal) १०० टक्के लम्पी लसीकरण (Lumpy Skin Vaccination) आवश्‍यक आहे.

शर्यतीत सहभागी होणाऱ्या सर्व बैलांच्या जोड्यांचेही लम्पी लसीकरण आवश्‍यक आहे. या संदर्भात शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, शासकीय पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला आवश्यक असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. परवानगी देताना या अटींचे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

बैलगाडा शर्यत भरविण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींमुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

जनावरांच्या बाजाराची प्रतीक्षा

सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गाय व बैलांचे आठवडे बाजार भरविले जातात. म्हैस व रेड्याचे आठवडा बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT