Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : जळगावात पशुधनाचे १०० टक्के लसीकरण

गुरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी स्कीन या आजाराला रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी ठरत आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव : गुरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी स्कीन या आजाराला (Lumpy Skin Disease) रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना (Safety Measures Lumpy Skin) प्रभावी ठरत आहे. आतापर्यंत लसीकरण मोहिमेत (Lumpy Skin Vaccination Drive) १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

३० सप्टेंबरअखेर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या दप्तरी नोंद असलेल्या १०० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे. तरीदेखील लसीकरणापासून जनावरे वंचित असल्यास पशुपालकांनी पशू वैद्यकीय दवाखाने किंवा जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे गुरांमध्ये दिसून आल्यानंतर व राज्य शासनाकडून या बाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली होती.

जिल्ह्यातील ग्रामीण भागासह खेड्या पाड्यांवर भेटी देऊन लक्षणे असलेल्या जनावरांची माहिती घेण्यासोबतच पशू पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना देखील राबविण्यात आल्या. त्यासोबतच पशू सखी, कृषी सखी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण देखील करण्यात आले. ५ ऑगस्टपासून प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे, या साठी विशेष मोहीम देखील घेण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT