Women Impowerment  Agrowon
ॲग्रो गाईड

Women Impowerment : महिला सक्षमीकरण प्रक्रिया महत्त्वाची....

Women Impowerment Process : व्यवसाय, उद्योग ही साधी गोष्ट नसते. ती दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यासाठी प्रेरणा सातत्याने देणे आणि ती दीर्घकालीन टिकेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांना आधार सेवा, सल्ला आणि उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे.

Team Agrowon

कांचन परुळेकर

Womens Development : व्यवसाय, उद्योग ही साधी गोष्ट नसते. ती दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यासाठी प्रेरणा सातत्याने देणे आणि ती दीर्घकालीन टिकेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांना आधार सेवा, सल्ला आणि उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे.

सक्षमीकरणाचे प्रशिक्षण उद्योजकता विकासात सर्वांत महत्त्वपूर्ण ठरते. सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे स्त्रीमुक्ती अन् त्यासाठी पुरुषांशी संघर्ष अशी विपरीत कल्पना बऱ्याच जणांच्या डोक्यात असते. वास्तविक आपल्या देशातील स्त्रिया स्वातंत्र्य मिळालेल्या दिवसापासून मुक्तच आहेत. फक्त त्या परावलंबी आहेत. कुटुंब, समाज, राजकारण आणि अर्थकारणात वावरताना त्यांना साथीला पुरुष लागतो. दुय्यम दर्जामुळे त्या स्वत:बद्दलचा दुर्दम्य आत्मविश्‍वास अन् कर्तृत्व शक्तीकडे दुर्लक्ष करतात.

ती त्यांची सहज प्रवृत्ती बनून जाते. त्यामुळे उद्योग क्षमतेत त्या कमी पडतात. या चक्रातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभावी प्रेरणा, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि भक्कम आधार सेवांची गरज भासते. सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे महिलांचा आत्मविश्‍वास कमी असतो. बाह्य जगाशी संपर्क मर्यादित असतो. व्यवसाय, उद्योग याबाबत त्या अनभिज्ञ असतात.

म्हणूनच त्यांना उद्योजक बनवायचे तर त्यांच्यात आत्मविश्वासाची पेरणी करून व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक क्षमता वृद्धिंगत केल्या पाहिजेत. आपण कोण व्हायचे, काय करायचे याचे जाणीव त्यांना करून देऊन त्यासाठीच्या क्षमता विकसित करायला हव्यात. तावून सुलाखून या बाबी त्यांच्यात रुजवायला हव्यात. म्हणून त्यांना आधार सेवा, सल्ला आणि उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे.

सक्षमीकरणाचे महत्त्व ः
१) सक्षमीकरण महिलेला स्वतःच्या जीवनाचा ताबा मिळवण्यास उपयोगी ठरते. जवळचे अन दूरचे लोक यांचेशी उत्तम संपर्क वाढविण्यास साह्यभूत ठरते. स्वतःमध्ये असणाऱ्या अनोख्या क्षमतांची जाण सक्षमीकरणाने येते. एवढेच नव्हे तर स्वसामर्थ्याची जाण आल्याने प्रगती मार्गातील अडथळे पार करण्याची क्षमता निर्माण होते.

२) सक्षमीकरण ही अशी गोष्ट आहे जी महिलेला स्वतंत्रपणे विचार करण्यास शिकवते. स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्याची प्रेरणा देते. स्वतःच्या जाणीवा अन् कुवतीचा अंदाज याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यास शिकवते. स्वतःच्या जाणीव अन कुवतीचा अंदाज याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यास शिकवते. केवळ विचारच नव्हे तर स्वतःच्या भावनांची तिला जाणीव होते. गरजा, इच्छा, राग, भीती याचा अनुभव घेतल्याने तिचा आतला आवाज तिला साद घालतो. केवळ दुसऱ्यांच्या इच्छेनुसार जगण्यासाठी आपला जन्म नसून आपणही एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहोत. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याचा अधिकार आपल्याला आहे याची जाणीव सक्षमीकरणाने होते.

३) स्वतःविषयी आदर बाळगणे, प्रगतीच्या शक्यता समजून घेणे, स्वतःच्या अद्भुत क्षमतांच्या जाणिवे ने आनंद अनुभवणे या गोष्टी सहज घडू लागतात. म्हणून आपण काय करू इच्छितो हे समजणे, इच्छा विकसित करणे, धाडस अन क्षमता जोपासणे याला सक्षमीकरण म्हणावे लागेल.
४) मला करावेसे वाटते +मी करू शकेन= मी करीनच करीन हे सबलीकरणाचे सूत्र आहे. प्रभावी प्रेरणा, कौशल्य व सामर्थ्यशीलतेचे प्रशिक्षण, भक्कम आधारसेवा या आधारे सबलीकरणाचा आविष्कार घडतो. इच्छा अन क्षमतांचा संयोग सक्षमीकरणास कारणीभूत ठरतो.

आर्थिक सबलीकरणासाठी प्रेरणा ः
प्रेरणा कशाला म्हणतात ते आधी समजून घ्यावे लागेल. माणसाच्या प्रत्येक कृती ही इच्छा अन् गरजांच्या पूर्ततेसाठी असते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांसाठी माणूस कृती करत राहतो. रोजगार मिळविणे, स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करते, स्वतःचा मालक बनणे अशा क्लिष्ट गरजांचाही यात समावेश होतो.

गरजांच्या पूर्ततेसाठी माणसाची आयुष्यभर धडपड चालते. ही जी अखंड धडपड असते तीच माणसाला कृतीशील बनवते. त्यालाच प्रेरणा म्हटले जाते. जीवशास्त्रीय शारीरिक प्रेरणा हा एक प्रकार तर भावना, क्षमता व सामाजिक मान्यता इत्यादीसाठी प्रेरणा हा दुसरा प्रकार. महिलांना प्रेरणा देण्यापूर्वी वास्तव जाणून घेऊन प्रेरणेतून अपेक्षित परिवर्तन कोणते ते समजून घेऊयात.


महिलांचे वास्तव--- कशासाठी प्रेरित करणे गरजेचे
· नकारार्थी अन् कमी दर्जाची स्वप्रतिमा---होकारार्थी स्वप्रतिमा
·इच्छाच नसणे---दुर्दम्य इच्छाशक्ती जागृती
·क्षमतांची जाणीव नसणे----स्वतःच्या क्षमतांची जाणीव

· माघार घेणे/ बाहेरच्या जगाला घाबरणे---पुढाकार घेणे/बाहेरच्या जगाला धाडसाने भिडणे
· परावलंबित्व----स्वावलंबन , स्वयंनिर्भरता
· क्षीण प्रेरणा----तीव्र प्रेरणा
· जाणिवांची कमतरता----स्वतःच्या इच्छा, भावना यांची तीव्र जाणीव

उद्योग व्यवसायासाठी वेगवेगळी उद्दिष्टे, प्रेरणा ः
१. आर्थिक प्रेरणा ः रोजगार प्राप्ती, पैसा कमविणे. पैसा कमावणारी स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रस्थापित होणे.
२. कौटुंबिक प्रेरणा ः कुटुंबाच्या भावी कल्याणासाठी, पालकांच्या खुशीसाठी, नवरा/बायकोच्या आनंदी जीवनासाठी.
३. स्वसमाधान ः स्वावलंबी बनणे, व्यवसायातून नाव कमविणे, स्वतःच्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करणे.

४. सेवा प्रेरणा ः लोकांना रोजगार देणे. देश, समाजाच्या अर्थकारणात सहभाग घेणे.
५. सामाजिक प्रेरणा ः प्रतिष्ठा अन दर्जा प्राप्त करणे, नावलौकिक कमावणे, इतरांसाठी रोल मॉडेल बनणे, आदर्श व्यक्ती म्हणून विकसन पावणे.

६. इतर ः प्रत्येकाची वरील गोष्टींपेक्षा वेगळी प्रेरणाही असू शकते.
जोमदार प्रेरणा मिळाल्यास उद्योग यशस्वीतेकडे वेगाने जातो. व्यवसाय, उद्योग ही साधी गोष्ट नसते. ती दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यासाठी प्रेरणा सातत्याने देणे आणि ती दीर्घकालीन टिकेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेरणा ही पोस्टर, गीते, प्रात्याक्षिके, अनुभव कथन, अभ्यास सहली, उद्योजकांशी चर्चा, मुलाखती, चरित्र वाचन, उद्योग विषयक पुस्तके/ मासिके वाचन, यू-ट्यूब, व्याख्याने याव्दारे देता येते.

संपर्क ः ०२३१- २५२५१२९
(लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT