Crop Protection Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : जास्त थंडी फळपिकांसाठी का आहे हानीकारक?

कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानातील फरकाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. विविध फळपिकांमध्ये मुख्यतः तापमान बदलाचा परिणाम होतो.

Team Agrowon

कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानातील फरकाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. विविध फळपिकांमध्ये (Fruit Crop) मुख्यतः तापमान बदलाचा परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर त्याचा पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा आदी कारणांमुळे झाडांना इजा होते. परिणामी फळझाडांचे मोठे नुकसान होते. अशा प्रतिकूल हवामानात फळझाडांवर कोणते परिणाम होतात याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. आदिनाथ ताकटे यांनी दिलेली माहिती पाहुया.  

- कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते, वनस्पतींच्या पेशी मरतात, फळपिकांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

- थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यांवर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणातील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तिहीन होऊन पेशी मरू लागतात. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा शीत हवामानाला प्रतिकार करू शकतात.

- अतिशीत तापमानामुळे खोड आणि फांद्या यांच्या आतील भाग काळा पडून ठिसूळ बनतो. विशेषतः रोपवाटिकेतील कोवळी कलमे यास बळी पडतात. कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात.

- तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळ्यापर्यंत पोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डोपेस्ट लावून त्यात बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.

- उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरीमुळे जास्त नुकसान पोचते. आंब्याचा मोहोर जळतो. सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून ती थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात. तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. जास्त थंडीमुळे झाडे मरतात.

- तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा वाईट परिणाम होतो. द्राक्षाची फळे गळतात, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते.

- संत्रा, मोसंबीत १० अंश सेल्सिअसच्या खाली तापमानात वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Management: ‘पंदेकृवि’मध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Davos Investment: दावोसमध्ये पहिल्या दिवशी १४ लाख कोटींवर करार

Vineyard Ultra Marathon: ‘सह्याद्री’च्या शिवारात विनियार्ड अल्ट्रा मॅरॅथॉनचे आयोजन

Women Entrepreneur: शेतमजूर महिलेने बदलले ६५ व्या वर्षी ‘करिअर’

Farmer Issues: पैशासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT