Wheat Varieties
Wheat Varieties Agrowon
ॲग्रो गाईड

Wheat Varieties : गहू लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड कराल?

Team Agrowon

महाराष्ट्रात रब्बी हंगामात (Rabbi Season) मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड (Wheat Cultivation) केली जाते. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणांचा वापर, योग्य प्रकारे खत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबींचा अवलंब करून गव्हाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यापैकी गहू लागवडीसाठी गव्हाच्या कोणत्या जातीची निवड करावी याविषयी कृषी संशोधन केंद्र, निफाड येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

सुधारित जाती 

बागायत वेळेवर पेरणी 

१) सरबती जाती ः फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, एम.ए.सी.एस. ६२२२, एमएसीएस-६४७८.

- बागायती उशिरा पेरणीसाठी फुले समाधान, एकेएडब्ल्यू - ४६२७ जातीची शिफारस.

- पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एनआयएब्ल्यू - १४१५ (नेत्रावती) आणि एचडी २९८७ (पुसा बहर) जातींची निवड करावी.

२) बन्सी जाती 

- बागायती वेळेवर पेरणी एनआयडीडब्ल्यू - २९५ (गोदावरी) जातीची निवड करावी.

- एमएसीएस-४०२८, एमएसीएस- ४०५८ जातींची निवड करावी.

३) नवीन प्रसारित जाती 

१) फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४) ः

- ही जात बागायती क्षेत्रात वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी योग्य आहे.

- वेळेवर पेरणीसाठी उत्पादन ४६.१२ क्विंटल/हेक्टर मिळते.

- उशिरा पेरणीमध्ये उत्पादन ४४.२३ क्विंटल / हेक्टर मिळते.

- ही जात तांबेरा रोग तसेच मावा किडीस प्रतिकारक्षम आहे.

- चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित जातीपेक्षा सरस.

- प्रचलित जातीपेक्षा ९ ते १० दिवस लवकर तयार होते.  

२) फुले सात्त्विक (एन.आय.ए.डब्ल्यू.३१७०)ः

- संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी प्रसारित.

- प्रथिनांचे प्रमाण ११ ते १२ टक्के, बिस्कीट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त.

- दाण्याचा कडकपणा खूप कमी म्हणजे (३० ते ४५ टक्के) तसेच ब्रेड गुणवत्ता स्कोअर ७.० ते ७.५०, ग्लूटेन इंडेक्स ८० ते ८५ टक्के.

- चपातीचा गुणवत्ता स्कोअर हा ७ ते ७.५. यामध्ये लोहाचे प्रमाण हे ३५ ते ४० पीपीएम, झिंक ३० ते ३५ पीपीएम. -तांबेरा रोगास प्रतिकारक्षम.

- उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी.

एनआयडीडब्ल्यू -११४ 

- द्विपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी बन्सी जात शिफारशीत आहे.   .

- तांबेरा रोगास प्रतिकारक असून शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम आहे.

- तयार होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस.

- उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT