Soil Nutrient Management : अनेक शेतकरी माती परिक्षण करतात. पण काही शेतकरी माती परिक्षण वेळवर करत नाहीत तर काही शेतकऱ्यांना आपण मातीपरिक्षण नेमक कोणत्या उद्देशानं करतोय हेच माहीत नसत. त्यामुळे माती परिक्षणाचा म्हणावा तसा फायदा होत नाही.
माती परीक्षण आपण नेमक्या कोणत्या उद्देशाने करणार आहोत, हे माहिती असले पाहिजे. कारण उद्देशानूसार माती परिक्षणाचा नमुना घेण्याची पद्धत ही वेगवगळी असते. त्यानुसार शेतातून मातीचा नमुना घेण्याची पद्धत ठरवावी लागते. शेतामधील माती साधारणतः तीन उद्देशांसाठी तपासली जाते. यामध्ये
पहिला उद्देश म्हणजे विविध हंगामी पिके म्हणजे तुम्ही जर अन्नधान्य पिके, भाजीपाला किंवा फुल पिके जर घेणार असाल तर या पिकाच्या खत नियोजनाच्या दृष्टीने माती परिक्षण कराव लागत.
तुम्ही जर बहूवर्षीक म्हणजे लिंबू, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ आणि चिकू यासारखी फळपिके घेणार असाल तर या फळपिकांच्या खत नियोजनासाठी माती परिक्षण करावं लागत. हा झाला दुसरा उद्देश. आणि मातीपरिक्षणाचा तिसरा उद्देश म्हणजे तुम्ही जर नविन फळबागेची लागवड करणार असाल तर त्यासाठी आपली जमीन योग्य आहे किंवा नाही हे तपासण्याची गरज असते. या उद्देशानूसार मातीपरिक्षणाचा नमुना घेऊन मातीपरिक्षण केले तर त्याचा नक्कीच फायदा होतो.
हा झाला मातीपरिक्षणाचा उद्देश आता पाहुया माती परिक्षण नेमक केंव्हा करायच याबद्दलची माहिती
मातीचा नमुना घेण्याची वेळ
-मातीचा नमुना शक्यतो खरीप किंवा रब्बी पिकाच्या काढणीनंतर जमीन नांगरणी करण्याआधी आणि कोरडी असताना घ्यावा. कारण माती परीक्षण अहवाल पुढील हंगामातील पेरणीपूर्वी उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणजे त्यानुसार खतांचा नियोजन करण सोप जात.
-प्रयोगशाळेत नमुना दिल्यानंतर साधारणपणे अहवाल मिळण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागू शकतो.ते गृहीत धरून मातीचा नमुना प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवावा. माती परिक्षणाच्या प्रयोगशाळा जवळचे कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी असतात. या ठिकाणी माफक शुल्कामध्ये माती परिक्षण करून अहवाल मिळतो. काही शहरामध्ये खासगी प्रयोगशाळेतही मातीपरीक्षण करुन मिळत.
-
माती परिक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावा. विशेष करुन आपण कोणती पिके घेणार आहोत त्यानूसार खत नियोजनाची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा.
-माती परीक्षण अहवालाची वैधता ही साधारणपने दोन ते तीन वर्षांपर्यंत असते. त्यानंतर पुन्हा माती परिक्षण कराव. यामध्ये पाण्याची सोय असलेल्या शेतात वर्षातून दोन किंवा जास्त हंगामात पिके घेत असाल तर अशा शेताचे माती परीक्षण दर दोन वर्षांनी कराव. आणि जर तुम्ही वर्षातून फक्त एकाच हंगामात पीक घेत असाल तर अशा शेताचे दर तीन वर्षांनी माती परीक्षण कराव.
अशा प्रकारे योग्य वेळी मातीपरिक्षण करुन मातीपरिक्षणाचा अहवाल समजून घेऊन खत नियोजन केल तर मातीपरिक्षणाचा नक्कीच फायदा होतो.
----------------
माहिती आणि संशोधन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.