Fertigation Technique
Fertigation Technique Agrowon
ॲग्रो गाईड

पिकाला विद्राव्य खते कशी द्याल?

Team Agrowon

सूक्ष्म सिंचन किंवा ठिबक सिंचन संचांमधून पाण्याबरोबरच द्रवरूप किंवा पाण्यात विद्राव्य विरघळणारी खते पिकास देणे यालाच फर्टिगेशन (Fertigation) म्हणतात. सूक्ष्म सिंचन संचामधून पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी प्रामुख्याने खताची टाकी, व्हेंचुरी आणि इंजेक्शन पंप इत्यादी उपकरणे वापरली जातात.

व्हेंचुरी

ही डमरूच्या आकाराची मध्यभागी कमी होत जाणाऱ्या व्यासाची असल्यामुळे पाण्याचा वाहण्याचा वेग वाढतो. व्हेंचुरी च्या मध्यभागी उपलब्ध दाब कमी होऊन खताच्या टाकीमधील खताचे शोषण होते. पुढे मुख्य नळी मधून संचामध्ये आलेले खत उपनळ्यांमधून सिंचनाच्या वेळी ड्रीपर्स मार्फत जमिनीवर दिले जाते. खत टाकी मधील पाण्यात मिसळावे. नंतर त्या टाकीत व्हेंचुरी नलिकेतून निघालेली नळी सोडावी. ठिबक संच सुरु केल्या नंतर दोन्ही नियंत्रक झडपा सुरु केल्यानंतर टाकीतील खत व्हेंचुरीतून शोषले किंवा ओढले जाते. हे खत संचाच्या पाईप मधील पाण्याच्या प्रवाहात मिसळून उपनलिकेवरील असलेल्या ड्रीपर मधून अथवा झाडाच्या पिकांच्या मुळाच्या कक्षेत सोडले जाते.

खत टाकी

खताच्या टाकीमध्ये पाण्यात विरघळणारी खते ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या मुळाच्या कार्यक्षम क्षेत्रात देता येतात. टाकीचा व्यास ३० ते ५० सेंमी व क्षमता ३० ते १६० लिटर असते. या टाकीला पाणी आत येण्याचे व बाहेर जाण्याचे अशा प्रकारचे दोन पाईप असतात. आत येण्याचे तोंड टाकीच्या तळाशी उघडले जाते तर बाहेरचे तोंड खताच्या टाकीच्या जाळीस वरच्या बाजूस असते. मुख्य वाहिनीवर दोन जोडाच्या मध्ये एक झडप बसवलेली असते. त्यामुळे पाणी आत येण्याच्या वेगावर नियंत्रण ठेवता येते. आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या पाईपच्या तोंडाजवळील पाण्याच्या दाबातील फरकामुळे खत मिश्रित पाणी मुख्य नळीत ओढले जाते. टाकीतील खत मिश्रित पाण्याचे द्रावण टाकीच्या आतील तोंडाद्वारे येणाऱ्या पाणी प्रवाहामुळे टाकीच्या बाहेरच्या तोंडाद्वारे मुख्य वाहिनीत सोडले जाते. त्यामुळे टाकीतील पाण्यात विरघळलेल्या खताची तीव्रता हळूहळू कमी होऊन शेवटी मूळ पाणी शिल्लक राहते.

इंजेक्शन पंप

यामध्ये इंधन, विद्युत ऊर्जा किंवा पाण्याचा दाब वापरून खत मुख्य नळी मध्ये सोडले जाते. पंप किमतीने जास्त असतात. त्यामुळे शक्यतो हरितगृहामध्ये खते देताना अशा प्रकारचे इंजेक्शन पंप वापरले जातात. ठिबक सिंचनाखाली क्षेत्र जास्त असल्यावर देखील असे पंप तयार करण्यासाठी गंजविरहित साहित्य म्हणजे प्लास्टिक, फायबर याचा वापर केला जातो. खत मिश्रित पाण्याच्या सहवासात येणाऱ्या भागावर अशा साहित्याचे आवरण किंवा कोटिंग तयार केले जाते.

फर्टिगेशन करताना घ्यावयाची दक्षता

- ठिबक तोट्या किंवा ड्रिपर्स जमिनीवर योग्य रीतीने ठेवावेत. ठिबक तोट्या किंवा ड्रिपर्स यामध्ये माती किंवा पाला पाचोळा जाणार नाही याची काळजी घ्यावी.

ठिबक सिंचन संचामध्ये खत, शेवाळ, गंधक, लोह किंवा इतर क्षार साचू देऊ नये. त्यामुळे ठिबक तोट्या बंद पडतात. शेवाळ असल्यास क्लोरीन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आम्ल प्रक्रिया करावी.

- घनरूप खते पाण्याबरोबर देताना ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारी म्हणजेच विद्राव्य असणे आवश्यक आहे. पाण्यातील मीठ किंवा इतर रसायनाबरोबर खताची रासायनिक प्रक्रिया झाल्यास कॅल्शियम व सल्फेट पासून जिप्सम तयार होतो आणि संच बंद पडतात. अशावेळी संचाला आम्ल प्रक्रिया करून संच स्वच्छ करावा.

- ज्या संचांमधून फर्टीगेशन करायचे आहे तो संच वापरण्यास सुलभ असावा. योग्य डिझाईन केलेला प्रमाणित दाब उपलब्ध करणारा संच असेल तर सर्व साधने वापरता येतात.

- जिवाणूमुळे मॅंगेनीज ऑक्साईड जे तांबड्या, काळ्या रंगाचे असते ते तयार होते. पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारांची कॅल्शियम, मॅग्नेशियम बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन तोट्यामध्ये पांढऱ्या रंगाचा साका तयार होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT