काय आहेत ज्वारी, करडई, कापसाच्या नवीन वाणाची वैशिष्ट्ये ?

बीजोत्पादन साखळीमध्ये तीनही पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे.
New Varieties Of Vnmkv
New Varieties Of VnmkvAgrowon

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित करडई, (Safflower) देशी कपाशी (Cotton) आणि खरीप ज्‍वारीच्‍या (Jowar) नविन वाणास भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. परभणी शक्ती हे ज्वारीचे देशातील पहिले जैवसंपृक्त वाण असून करडई पिकाच्या पीबीएनएस १८४ वाणामध्ये तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के आहे तर देशी कपाशीचे पीए ८३७ हे वाण रसशोषक किडी व दहीया रोगास सहनशील आहे.

New Varieties Of Vnmkv
चाऱ्यासाठी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र

बीजोत्पादन साखळीमध्ये तीनही पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होणार आहे.

काय आहेत नविन वाणाची वैशिष्ट्ये ?
खरीप ज्वारी
परभणी शक्ती (पीव्हीके १००९) हे वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे. देशातील पहिले जैवसंपृक्त वाण म्हणून परभणी शक्ती या वाणास या अगोदर महाराष्ट्र राज्य वाण प्रसारण समितीने मान्यता दिली आहे. जैवसंपृक्त (बायोफॉर्टीफाईड) म्हणजे परभणी शक्ती वाणाच्या प्रति किलो ज्वारीच्या दाण्यांमध्ये ४२ मि. ग्रॅम लोह असुन २५ मि. ग्रॅम जस्ताचे प्रमाण आहे. जे ज्वारीच्या इतर वाणापेक्षा अधिक आहे. हे वाण संकरित वाणासारखेच दिसते. या वाणाची उंची एकसारखी म्हणजे १७० ते १८० सेंमी असून एकाचवेळी पक्व होते. हे वाण ११० ते ११५ दिवसात परिपक्व होते. दाणे पांढरेशुभ्र असून भाकरी चवीला गोड, चविष्ट आणि टिकाऊ बनते.

New Varieties Of Vnmkv
Cotton : कापूस वेचणी यंत्राची चाचणी अंतिम टप्प्यात

करडई
करडई पिकाच्या पीबीएनएस १८४ या वाणाची महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इ. राज्‍याकरिता शिफारस करण्यात आली आहे. पीबीएनस १८४ या वाणाचे उत्पादन हेक्‍टरी १५३१ किलो असुन तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के आहे. पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२३ दिवसाचा आहे.

कापूस
देशी कपाशीचे पीए ८३७ हे वाण आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्‍यात लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आले आहे. या वाणाचे उत्पादन हेक्‍टरी १५ ते १६ क्विंटल असून धाग्याची लांबी २८ मिली मिटर तर तलमपणा ४.८ आहे. हा वाण रसशोषक किडी व दहीया रोगास सहनशील असून परिपक्व होण्याचा कालावधी १५० ते १६० दिवसाचा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात या वाणाचे उत्पादन चांगले मिळाले आहे. लवकरच हे वाण काही चाचण्यांनंतर महाराष्ट्रात देखील प्रसारित केले जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com