विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहेत.
ग्रेड १९:१९:१९ या खतांस स्टार्टर ग्रेड म्हणतात. यामध्ये १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात नत्र, स्फुरद व पालाश आहे. यातील नायट्रोजन हा अमोनिकल, अमाईड आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध आहे. या खतांच्या आम्ल गुणांमुळे ठिबक संचाची छिद्रे बंद होत नाहीत. अन्नधान्य, भाज्या, फळपिकांसाठी उपयुक्त.
ग्रेड १२:६१:० १२ टक्के नत्र व ६१ टक्के फॉस्फरस असलेले १०० टक्के पाण्यात विद्राव्य खत. कॅल्शियमयुक्त खते वगळता सर्व विद्राव्य खतांबरोबर मिसळून वापरता येते. नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी योग्य. फुलांच्या पुर्ण वाढीसाठी व तुरे येताना उपयुक्त.
ग्रेड ०:५२:३४ खतांमध्ये ५० टक्के स्फुरद व ३४ टक्के पालाश असते. फुले लागण्याच्या व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी, आकर्षक रंगासाठी उपयुक्त. कॅल्शियम युक्त खतांसोबत मिश्रण करू नये. पिकांवर फवारले असता पीक करपण्याचा धोका कमी असतो.
ग्रेड १३:०:४५ या मध्ये १३ टक्के नत्र व ४५ टक्के पालाश आहे. फळ धारणा व त्याची वाढ होत असताना फवारावे. फळाचा आकार व त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. जड धातू व क्लोराईडस् विरहित आहे. फळे अकाली गळणे थांबवते. खतांमुळे पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात.
ग्रेड सीए – १९ टक्के एन-१५.५ टक्के मुळांची आणि हिरवी वाढ होण्यास मदत करते. पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती वाढवते. यात १०० टक्के पाण्यात विद्राव्य स्वरूपात कॅल्शियम आणि नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजनही त्वरित मिळतो. आम्ल व अल्कली गुणधर्माच्या जमिनीत वापरता येते. फळे सडणे, फळांना तडे पडणे कमी होते. केवळ ठिबक सिंचनामध्ये वापर करावयाचा असेल तर फॉस्फेट व सल्फेट असलेल्या खतांबरोबर मिश्रण करू नये.
ग्रेड ०:०:५०-१८एस पोटॅश ५० टक्के आणि गंधक १८ टक्के गंधकामुळे उत्पादनाचा दर्जा वाढतो, स्वाद येतो. कीड, रोगांच्या प्रादुर्भावास प्रतिकारक्षमता वाढते. पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते. फळांतील साखरेचे प्रमाण, आकार, दर्जामध्ये सुधारणा होते. फळ लवकर पिकते, क्लोरीन विरहित खत.
फवारणीद्वारे वापर
सूक्ष्म अन्नद्रव्ये, खतांचे फवारणीद्वारे द्यावयाचे प्रमाण
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.