डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे Agriculture Innovation: भारतीय बाजारपेठेमध्ये प्रत्येक फळांच्या प्रकारानुसार पॅकेजिंगच्या एक किंवा एकापेक्षा जास्त पद्धती वापरल्या जातात. स्थानिक बाजारासाठी आणि दूरवरच्या बाजारासाठी वाहतुकीच्या अंतराप्रमाणेही त्यात बदल होतो. पारंपरिक टोपल्या, लाकडी पेट्या यांना आता विविध पर्याय पुढे आले आहेत. त्याची माहिती या लेखातून घेऊ..संत्री : जाळीदार पिशव्यांऐवजी संत्र्यांसाठी व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक ट्रे किंवा सी. एफ. बी. बॉक्सेस वापरले जातात. ट्रेमध्ये प्रत्येक फळासाठी स्वतंत्र जागा ठेवलेली असते. त्यामुळे फळे एकमेकांवर दाबले किंवा घासले जात नाहीत. लांबच्या वाहतुकीसाठी तापमान आणि आर्द्रता नियंत्रित कंटेनरचा वापर केला जातो.पेरू : व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक ट्रे किंवा सी. एफ. बी. बॉक्सेसमध्ये पॅकिंग केल्यास पेरू नरम होण्यापासून वाचतात. प्रत्येक पेरूला पातळ कागदात लपेटल्यास अधिक संरक्षण मिळते. तापमान नियंत्रित वाहतूक ताजेपणा टिकवते. हे लवकर खराब होणारे फळ असल्याने जलद वाहतूक महत्त्वाची आहे..अननस : प्रत्येक अननसला प्लास्टिकच्या जाळीदार पिशवीत गुंडाळून व्हेंटिलेटेड सी. एफ. बी. बॉक्सेसमध्ये वेष्ठन करावे. यामुळे फळांना हवा खेळती राहते आणि नुकसान टळते. तापमान नियंत्रित वाहतूक गुणवत्ता टिकवते. जास्त दाब टाळण्यासाठी योग्य स्टॅकिंग आवश्यक आहे.टरबूज : मोठ्या टरबुजांसाठी मजबूत सी. एफ. बी. बॉक्सेस किंवा प्लास्टिक क्रेट्स वापरावेत. लहान टरबुजांसाठी श्रिंक रॅपिंग करता येईल. वाहतुकीदरम्यान कुशनिंग महत्त्वाचे आहे. फळांना इजा होऊ नये म्हणून काळजीपूर्वक हाताळणी करणे आवश्यक आहे..खरबूज : प्रत्येक खरबूज प्रोटेक्टिव्ह नेटमध्ये गुंडाळून व्हेंटिलेटेड सी. एफ. बी. बॉक्सेसमध्ये पॅक केले जातात. जास्त दाब टाळण्यासाठी एकावर एक रचताना काळजी घ्यावी. दूर अंतरावरील बाजारपेठेसाठी तापमान नियंत्रित वाहतूक आणि आर्द्रता व्यवस्थापन आवश्यक आहे.लिंबू : जाळीदार पिशव्यांऐवजी व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक ट्रे किंवा सी. एफ. बी. बॉक्सेस वापरावेत. योग्य हवा खेळती राहिल्यास जास्त काळ टिकतात. तापमान नियंत्रित वाहतूक आवश्यक आहे. जास्त ओलावा बुरशीला आमंत्रण देऊ शकतो..Food Packaging : अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमधील संधी.डाळिंब : डाळिंबाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये एकेक फळ ठेवून सी. एफ. बी. बॉक्सेसमध्ये वेष्ठन करावे. बॉक्समधील आर्द्रता नियंत्रित ठेवल्यास फळे जास्त काळ ताजीतवानी राहतात. त्यांची त्वचा सुरकुत्यांपासून वाचते. वाहतुकीदरम्यान फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. फळांवर डाग पडल्यास त्याचा विक्री किमतीवर परिणाम होऊ शकतात. पॅकिंगमध्ये योग्य वायुवीजन असल्यास बुरशीच्या वाढीस प्रतिबंध होतो.स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाजूक फळ आहे. त्याच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकचे क्लॅमशेल कंटेनर सर्वोत्तम आहेत. त्यामुळे फळांवर येणारे विविध दाब आणि बाहेरील आघातांपासून बचाव शक्य होतो. स्ट्रॉबेरी लवकर खराब होणारे फळ असल्याने तापमान नियंत्रित वाहतूक (० ते ४°C) आणि जलद वितरण आवश्यक आहे. पॅकेजिंगमध्ये जास्त फळे एकमेकांवर ठेवणे टाळावे. आकर्षक आणि पारदर्शक कंटेनर ग्राहकांना फळांकडे आकर्षित करू शकतात..आवळा : आवळा फळांना जास्त ओलावा हानिकारक ठरतो. त्यामुळे हवा खेळती राहील अशा प्रकारच्या व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक पिशव्या किंवा CFB बॉक्सेस वापरावेत. वाहतूक कोरड्या स्थितीत केल्यास बुरशीला प्रतिबंध होतो. दाबाने फळे खराब होऊ नये, यासाठी जास्त प्रमाणात पॅकिंग करणे टाळावे.फणस : फणसाच्या लहान तुकड्यांसाठी प्लॅस्टिकचे कंटेनर आणि मोठ्या फळांसाठी मजबूत CFB बॉक्सेस किंवा जाळीदार पिशव्यांचा वापर करावा. फळातील उष्णता बाहेर पडून लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वायुवीजन (ventilation) महत्त्वाचे आहे. या फळांचे आकार लहान मोठे आणि वेडेवाकडे असल्याने त्यानुसार योग्य पॅकेजिंग आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक आणि हाताळणी सोपी होते..अंजीर : अंजीर हे अत्यंत नाजूक फळ आहे. ताजे अंजीर शक्यतो लहान, उथळ प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये एका थरात ठेवावेत. त्यामुळे ते एकमेकांवर दाबले जाणार नाहीत. ओलावा टिकून राहण्यासाठी ट्रेला हलक्या प्लॅस्टिक फिल्मने झाकता येते. यामुळे धूळ आणि अन्य बाह्य घटकांपासून संरक्षण मिळते. लांबच्या वाहतुकीसाठी, प्रत्येक अंजीर मऊ कागदात लपेटून लहान कंपार्टमेंट असलेल्या CFB बॉक्सेसमध्ये पॅक करावे. कमी हाताळणीसह तापमान नियंत्रित वाहतूक (विशेषतः ० ते ५°C तापमान) अंजीर फळे ताजी ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. मुळात अंजिराचा साठवण कालावधी अत्यंत कमी आहे. त्यात पॅकिंगमध्ये जास्त पिकलेले अंजीर ठेवले गेल्यास फळे लवकर खराब होण्याची शक्यता असते..पीच : पीच फळांना दाब आणि खरचटण्यापासून वाचवण्यासाठी मोल्डेड प्लास्टिक ट्रेमध्ये एकेक ठेवून CFB बॉक्सेसमध्ये पॅकींग करावे. या फळासाठी तापमान नियंत्रित वाहतूक (० ते ५°C) आवश्यक आहे. फळांच्या पिकण्याच्या अवस्थेनुसार पॅकेजिंग आवश्यक असते, कारण जास्त पिकलेली फळे लवकर नरम होतात. योग्य कुशनिंग असलेले पॅकेजिंग वाहतुकीतील नुकसान कमी करते.नासपाती : नासपाती फळांना इजा न होता व्यवस्थित ठेवण्यासाठी मोल्डेड प्लॅस्टिक ट्रेमध्ये एकेक ठेवून CFB बॉक्सेसमध्ये पॅक करावे. नियंत्रित वातावरणातील साठवण (CA स्टोरेज) वाहतुकीदरम्यान त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. योग्य स्टॅकिंग आणि तापमान नियंत्रण (० ते १°C) या फळासाठी आवश्यक आहे..Food Packaging Technology : खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी तंत्रज्ञान.पपई पॅकेजिंगप्रत्येक पपई फळ फोम नेटमध्ये गुंडाळून सी. एफ. बी. बॉक्सेसमध्ये वेष्ठन केली जाते. त्यामुळे फळांचे बाह्य आघातापासून संरक्षण होते. तापमान आणि आर्द्रता नियंत्रित वाहतूक आवश्यक आहे. फळांच्या पक्वतेच्या टप्प्यानुसार किंवा अवस्थेनुसार पाहून पॅकिंग करावे लागते. अन्यथा जास्त पिकलेल्या फळांसोबत अन्य फळेही खराब होऊ शकतात.द्राक्षे पॅकेजिंगलहान प्लास्टिक क्लॅमशेल कंटेनरमध्ये द्राक्ष घडांचे पॅकिंग केले जाते. त्यामुळे घडापासून द्राक्ष तुटत नाहीत, त्याचा ताजेपणाही अधिक काळ टिकतो. निर्यातीसाठी सल्फर पॅड असलेले सी. एफ. बी. बॉक्सेस फळांचे बुरशीपासून संरक्षण करतात. तापमान नियंत्रित वाहतूक द्राक्षांची गुणवत्ता राखण्यासाठी मदत करतात..आंबा पॅकेजिंगभारतात स्थानिक बाजारामध्ये आंबा नेण्यासाठी बांबूच्या टोपल्यांचा वापर सामान्य आहे. त्यात फळे आतून घासली जाऊ नयेत, यासाठी मऊ पदार्थ (कुशनिंग) म्हणून विविध प्रकारचा पालापाचोळा, लाकडी वूल, वृत्तपत्रांचे तुकडे आणि पॉलिथिलीन फिल्म्स यांचा वापर केला जातो. यांची उपलब्धता स्थानिक कारागिरांकडून होत असल्याने स्थानिक रोजगारामध्ये वाढ होते. त्यांची किंमतही कमी राहते. मात्र आतून खरबडीतपणामुळे फळे घासली जाऊन ती खराब होण्याची शक्यता असते. त्यांनंतर लाकडी पेट्यांचा प्रामुख्याने वापर होतो. अलीकडे काही ठिकाणी नालीदार फायबरबोर्ड (CFB) बॉक्सेस आंब्याच्या पॅकेजिंगसाठी वापरू लागल्याचे दिसते..केळी पॅकेजिंगपूर्वी केळी संपूर्ण घड म्हणून केळ्याच्या पानांमध्ये गुंडाळून वाहतूक केली जात असे. लांबच्या वाहतुकीसाठी पॉलिथिलीन फिल्म बॅग्स वापरणे फायदेशीर ठरते. निर्यातीसाठी टेलिस्कोपिक प्रकारचे नालीदार फायबरबोर्ड बॉक्सेस वापरले जातात. त्यात चांगल्या वायुविजनासाठी छिद्रे ठेवलेली असतात. घड बॉक्समध्ये आडवे ठेवले जातात. त्यावेळी फळांचे टोक झाकणाच्या दिशेने ठेवले जाते. या बॉक्सेसची रचून ठेवण्याची क्षमता चांगली असते..सीताफळ पॅकेजिंगनाजूक संरचनेमुळे सीताफळाचे पॅकेजिंग अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. प्रत्येक फळाला मऊ कुशनिंग साहित्यामध्ये (उदा. फोम, पेपर श्रेडिंग) लपेटून पॅक करावेत. त्यासाठी अलीकडे स्वतंत्र कप्प्यांचे सी. एफ. बी. बॉक्सेस वापरले जातात. तापमान नियंत्रित वाहतूक (१५ ते २०°C) आणि कमीत कमी हाताळणी आवश्यक आहे, कारण दाबामुळे फळे लवकर खराब होऊ शकतात. जास्त पिकलेले सीताफळ वाहतुकीदरम्यान लगेच नरम होते. पक्वतेच्या योग्य टप्प्यावरील फळांची निवड महत्त्वाची आहे. आकर्षक आणि सुरक्षित पॅकेजिंग ग्राहकांना चांगल्या स्थितीत फळे मिळवण्यास मदत करते.- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७,(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.