Fodder Deficit
Fodder Deficit Agrowon
ॲग्रो गाईड

Fodder Deficit : टंचाई काळात चाऱ्याचं नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Team Agrowon

बहुतांश पशुपालक जनावरांना उन्हाळ्यात शेतीतील दुय्यम पदार्थ जसं कडबा, सोयाबीनची गुळी, भुसकट, बांधावरील गवत,तनीस, सरमाड, पालापाचोळा, गुव्हाचे भुसकट चारा म्हणून देतात. या चाऱ्याची पौष्टिकता (Fodder) कमी असते.

असा चारा जनावराच्या अन्नघटकाची गरज पूर्ण करु शकत नाही. या कारणांमुळे उन्हाळ्यातील चारा टंचाईत (Fodder Deficit) जनावरांच्या चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी सकस चाऱ्याची पिके घेऊन चाऱ्याचे योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. 

सध्या भारतातील जनावरांना आवश्यक असणाऱ्या हिरव्या चाऱ्यामध्ये (Green Defict) ६३.५० टक्के एवढी तुट आहे. तर वाळलेल्या चाऱ्यामध्ये २३.५६ टक्के एवढी तुट आहे. तर खुराकामध्ये ६४ टक्के तुट आहे. 

पशुधनवाढीचा दर १.२३ टक्के असून भविष्यात योणाऱ्या काही वर्षामध्ये चाऱ्याच्या मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत निर्माण होणार आहे. पशुसंवर्धन खात्याच्या २०१५ च्या अहवालानुसार देशात १७०० दशलक्ष टन चाऱ्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्ष उपलब्धता मात्र ८६५ दशलक्ष टन आहे. यामुळे चारा पिकाचे उत्पादन वाढविणं आवश्यक आहे. 

दुभत्या जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याची योग्य प्रमाणात उपलब्धता असणे हे फायदेशीर दूध उत्पादनाची पहिली पायरी आहे. प्राणीजन्य पदार्थांची वाढती मागणी पूर्ण करायची असेल तर पशुधनासाठी मुबलक प्रमाणात पौष्टिक चारा उपलब्ध करुन देणं आवश्यक आहे.  

जनावरांच्या शरीर पोषणासाठी व उत्पादनासाठी एकूण लागणाऱ्या शुष्क पदार्थांपैकी जास्तीत जास्त सकस हिरवा चारा देऊन त्याचा समन्वय जास्त प्रथिने व ऊर्जा, कमी तंतूमय पदार्थ असलेल्या खुराकाशी केला तर खुराकावरील बराच खर्च कमी होतो.

वाळलेल्या चाऱ्यात जास्त तंतूमय पदार्थ, कमी प्रतीची व नगण्य प्रथिने असतात. हा चारा फक्त पोट भरण्यासाठी दिला तर कमीत कमी खर्चात जास्तीचे दूध उत्पादन मिळू शकते.  

चारा पिकाचं चांगल उत्पादन मिळावं यासाठी जनावरांची संख्या, हिरव्या चाऱ्याची गरज, जमीन व पाण्याची उपलब्धता, उन्हाळी हंगामात घेतली जाणारी चारा पिकं, चारा पिकाच्या सुधारित जाती व त्यांची उत्पादनक्षमता आदींचा विचार करणं आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे हिरवा चारा हा स्वस्त व खुराक हा महाग आहार आहे. यशस्वी व फायदेशीर पशुपालनासाठी हिरवा चारा व खुराक या दोन्हींची योग्य सांगड घातली तर आहारावर होणारा बराच खर्च कमी होतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT