Soybean Mosaic Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Disease : सोयाबीनवरिल पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?

Soybean Mosaic Disease : पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.

Team Agrowon

Yellow Mosaic Disease : गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव होता. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकचं उपयून टाकावे लागले होते.  

हा रोग विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीन उत्पादनात १५ ते ७५ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे वेळीच या रोगाची लक्षणे ओळखून एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाय योजल्यास रोगावर नियंत्रण मिळवता येते.

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.

काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.

एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे?

पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झालेली पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.

फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.

नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.

कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावं.

पावसाचा ताण पडल्यास पिकाला संरक्षित पाणी द्यावं.

बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी. जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

 ------------

माहिती आणि संशोधन - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी

Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी 

MGNREGA Scheme: ‘मनरेगा’ ते ‘पूज्य बापू’ प्रवास!

Nagpur Winter Session: बौद्धिक दिवाळखोरी

Sugarcane Cultivation: सिंचनात वाढ अन् ऊस लागवडीला आला भर

SCROLL FOR NEXT