Beed News: परिसरातील अनेक गावांमध्ये बहुतांश सिंचन प्रकल्प, विहिरी व बोअरवेल मोठ्या प्रमाणात भरल्याने उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. सध्या शेतशिवारात ऊस लागवडीच्या कामाला मोठा वेग आला असून अनेक शेतकरी सहकुटुंब शेतात ऊस लागवड करताना दिसत आहेत..यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून विंधन विहिरी तसेच पारंपरिक विहिरींच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देत आहेत..Sugarcane Cultivation: आतापर्यंत आडसाली ऊसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड.उसाच्या नवनवीन प्रजातींची माहिती घेत उशिरा पक्व होणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ऊस लागवड केल्यास वेळेत ऊसतोड होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीची लगबग करत आहेत..बदलत्या परिस्थितीत भाजीपाला पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट, अवकाळी पाऊस यासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्य पिकांच्या तुलनेत ऊस पीक शेतकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित व आश्वासक ठरत आहे. एकदा लागवड केल्यानंतर हमखास उत्पादन मिळण्याची खात्री असल्याने सिंचन सुविधा असलेले शेतकरी उसाला पहिली पसंती देत आहेत. परिणामी परिसरात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसून येत आहे..Sugarcane Cultivation: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर उसाची लागवड.ऊस हे हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते.मात्र, मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लागवडीचा खर्च वाढला असला तरी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना घरातील महिलांसह लहान मुलांनाही ऊस लागवडीच्या कामासाठी शेतात सहभागी करून घ्यावे लागत आहे..‘अतिरिक्त’ उसाचा प्रश्न भेडसावणारशेतकऱ्यांनी पूर्वहंगामाच्या ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. यामध्ये ८५००, १०००१ अशा नवनवीन जातींच्या बियाण्यांचा वापर केला जातआहे. विशेषतः १०००१ या वाणाला पूर्वहंगामासाठी शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे. यामुळे पुढील गाळप हंगामात तालुक्यातील स्थानिक साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. परिणामी, पुढील वर्षी शेतकऱ्यांना अतिरिक्त उसाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे..गहू पिकाकडे शेतकऱ्यांची पाठशासनाच्या अन्नसुरक्षा योजनेमुळे शेतकऱ्यांनी गहू पिकाकडे मागील पाच ते सहा वर्षांपासून पाठ फिरवली आहे. शासनाकडून मोफत धान्य मिळत असल्याने गहू पिकाला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांची सरासरी पाहता गहू पेरणीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येते. चालू हंगामात तरी गहू पेरणी मोठ्या प्रमाणात होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे..कपाशीनंतर उसाला प्राधान्यकपाशीच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घट होत आहे. सध्या बाजारात कापूस हमीभावापेक्षा कमी दराने, सुमारे ७ हजार रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी ऊस लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे. एकरी ५० टनांपर्यंत उत्पादन निघाल्यास, मागील वर्षीच्या दरानुसार सुमारे १ लाख २५ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. एकरी अंदाजे ५० हजार रुपये खर्च झाला तरी हमखास उत्पादन मिळत असल्याने शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.