Vegetable Production  Agrowon
ॲग्रो गाईड

Vegetable Production : भाजीपाला उत्पादनावाढीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत?

Vegetable Crop : भाजीपाला वर्गीय पिकातील फळ भाजीपाल्याचे उत्पादन प्रामुख्याने झाडांना लागणार्‍या एकूण फळांच्या संख्येवर अवलंबून असते. फळभाज्या लागवडीच्या एकूण उत्पादन कालावधीमध्ये फळांची संख्या जर कमी झाली तर उत्पादनात घट येते.

Team Agrowon

Fruit Vegetable Crop Production : भाजीपाला वर्गीय पिकातील फळ भाजीपाल्याचे (Fruit Vegetable) उत्पादन प्रामुख्याने झाडांना लागणार्‍या एकूण फळांच्या संख्येवर अवलंबून असते. फळभाज्या लागवडीच्या एकूण उत्पादन कालावधीमध्ये फळांची संख्या जर कमी झाली तर उत्पादनात घट येते.  

फळांची संख्या कमी असणे हे अनेक बाबींवर अवलंबून असते. जसे लागवडीच्या कालावधी योग्य नसणे, योग्य वाणाची निवड न करणे, हवामानामध्ये एकदम बदल होणे, गारपीट होणे, अन्नद्रव्य  व पाण्याची कमतरता किंवा असमतोल वापर, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, परागीभवन व्यवस्थित न होणे इ. कारणांमुळे फळधारणा होण्यास अडचण येवू शकते व पर्यायाने कमी उत्पादन मिळते.

अशा वेळी भाजीपाला पिकांतील फळधारणेच्या समस्या व त्यावरील उपाययोजना जाणून घेऊन उपाय करणे आवश्यक आहे.

वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, प्रर्जन्यमान या प्रमुख घटकांचा फुलांच्या निर्मितीवर, परागीभवनावर, फळधारणेवर व वाढीवर परिणाम होत असतो. म्हणून भाजीपाला लागवडीसाठी व त्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य कालावधीची निवड करावी. 

अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम फुलांची निर्मिती, फळधारणा, फळांचा विकास यांवर होत असतो.  म्हणून दर्जेदार उत्पादनासाठी माती परिक्षणानुसार भाजीपाला पिकास समतोल अन्नद्रव्यांचा योग्य वेळी व योग्य मात्रेत मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर होणे अत्यंत महत्वाचे आहे. 

परपरागीकरण आवश्यक असलेल्या प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीच्या क्षेत्रात किंवा जवळपास मधमाशा, फुलपाखरे आधिक प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यांच्याअभावी परपरागीकरण, फळधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो.

कारण अशा पिकांमध्ये नर व मादी फुलांचे भाग एकत्र नसतात, त्यामुळे परपरागीकरणसाठी नर फुलांचे पुंकेसर मादी फुलांपर्यंत पोहचविण्यासाठी मधमाशा, फुलपाखरे व  वारा मदत करतात.

काही फळभाज्यांमधे द्वीलिंगी फुले जरी असली तरी त्यातील पुंकेसर व स्रीकेसर एकाचवेळी परपरागीकरणसाठी म्हणजेच फलधारणेसाठी तयार नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत परपरागीकरणसाठी मधमाशांची, फुलपाखरांची आवश्यकता असते.

त्यामुळे भाजीपाला उत्पादन क्षेत्रात किंवा जवळपास मधमाशा पालन केल्यास परपरागीभवन व्यवस्थित होऊन उत्पादनात वाढ  होईल व मधमाशा पालनातून मिळणार्‍या मधापासून अतिरिक्त आर्थिक फायदा होईल. 

काही भाजीपाला पिकांमध्ये, प्रामुख्याने वांगी या पिकाच्या एकूण फुलोत्पादनपैकी नैसर्गिक विकृतीमुळे फळधारणा क्षमतेमध्ये अपूर्ण असतात. या पिकांवर फुलांच्या निर्मितीस सुरुवात झाल्यानंतर संजीवकाची फवारणी केल्यास  फायदा होतो. 

सर्वसाधारणपणे वेलवर्गीय भाज्यांमधे नर व मादी अशी फुलांची वेगवेगळी निर्मिती होत असते. पिकांचे उत्पादन हे मादी फुलांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे मादी फुलांचे प्रमाण वाढल्यास उत्पादनात वाढ होते. त्यासाठी पीक २ व ४ पानांच्या अवस्थेत असतांना संजीवकचा  वापर केल्यास मादी फुलांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते. 

भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ व फळगळ संजीवकाच्या अभावामुळे होत असते. त्यामुळे फुलगळ व फळगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. (नँप्थालीन अ‍ॅसेटीक अ‍ॅसिड ) या संजीवकचा वापर करावा.

फळांची काढणी योग्य अवस्थेमध्ये व योग्यवेळी केल्यास नवीन फुलांच्या निर्मितीसाठी व उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी पर्यायाने आधिक उत्पादन मिळविण्यासाठी मदत होईल. 

पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर शक्यतो किडनाशकांचा वापर टाळावा. ते शक्य नसल्यास मधमाशांना हानिकारक असलेली किडनाशके वापरू नये किंवा जैविक किडनाशकांचा  वापर करावा. अशाप्रकारे उपाययोजना केल्यास पिकांची वाढ चांगली होईल तसेच फळधारणा चांगली होऊन दर्जेदार उत्पादन मिळेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT