Techniques of Tur Cultivation  Agrowon
ॲग्रो गाईड

Tur cultivation: अर्धरब्बी तूर लागवडीचे तंत्र जाणून घ्या

तूर हे अर्ध रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा अर्ध रब्बी तूर लागवडीकडे कल दिसून येतो.

Team Agrowon

तूर हे अर्ध रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक (Pulse Crop) आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा अर्ध रब्बी तूर लागवडीकडे (Tur Cultivation) कल दिसून येतो. सध्या विदर्भात लागवडी खालील बहुतेक जाती मध्यम ते उशिरा कालावधीच्या आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार नियोजनपूर्वक तूर पीक (Tur Crop) घेता येते. तूर द्विदलवर्गीय पीक असल्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीत असणारे जिवाणू हवेतील नैसर्गिक नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देतात. तुरीच्या झाडांचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. शिवाय पिकाच्या फेरपालटीमध्ये तूर पिकाला महत्त्वाचे स्थान आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार पुढीलप्रमाणे अर्ध रब्बी तुरीची लागवड करावी.

पेरणीसाठी मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. जमिनीची खोल नांगरट करून प्रती हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून शेवटच्या वखराची पाळी द्यावी. पेरणीपूर्वी बियाणाला ४ ग्रॅम थायरम किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 

पीडीकेव्ही आश्लेषा, आशा, पीकेव्ही तारा, बी डी एन ७१६, बीडीएन ७०८, फुले राजेश्वरी या सुधारित वाणांची निवड करावी. रायझोबियम व पीएसपी प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्याला पेरणीपूर्वी दोन ते तीन तास अगोदर लावून सावलीमध्ये वाळवावे. 

पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी व दोन झाडांतील अंतर २० सेंमी  ठेवावे. शक्यतो उताराला आडवी पेरणी करावी. प्रति हेक्टरी २५  ते ३० किलो बियाणे वापरावे. 

माती परीक्षणानुसार रासायनिक खते पेरणी सोबतच द्यावीत. हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश वापरावे. गंधक कमी असलेल्या जमिनीत २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे. जेथे ओलिताची सोय आहे तेथे या पिकाला साधारणतः फुलोरा अवस्था व पीक परीपक्वतेच्या वेळी ओलीत करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : गेले परतीच्या वाटे...

Insurance Reform Bill : हिवाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक मांडणार

Onion Market : लासलगाव बाजार समितीत नवीन खरीप कांद्याची आवक

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

SCROLL FOR NEXT