Cotton Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Crop Protection : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्या काळजी

मागील दोन तीन दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस झाला. विशेषतः पश्चिम विदर्भातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली. पाऊस झालेल्या भागात जमिनीवर बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे खरीप पिकांसोबतच कापूस पिकाचेही नुकसान होताना दिसत आहे. विशेषतः मर किंवा आकस्मिक मर रोगासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

डॉ. संजय काकडे

अति पाऊस झालेल्या कपाशीच्या (Cotton) शेतात पाणी साचून राहिल्यास त्याचा कापूस उत्पादनावर (Cotton Production) अनिष्ट परिणाम संभवतो. पीक पाण्यात दीर्घकाळ बुडून राहिल्यास कपाशीच्या मुळ्या (Cotton Plant Root) सडतात. विदर्भातील सध्याच्या पावसामुळे विशेषतः काळ्या भारी जमिनीतून पाण्याचा निचरा कमी होतो. कपाशी मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळे आवश्यक ती अन्नद्रव्ये उचलू शकत नाहीत. झाडे सुकू लागतात किंवा मलूल होतात, त्यालाच आकस्मिक मर रोग (Wilt Disease On Cotton) असे म्हणतात. वास्तविक यासाठी कोणतीही बुरशी, जिवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीत. म्हणजेच हा रोग नाही. कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा (Parawilt) प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण व मलूल होतात. खालच्या बाजूने वाकतात. झाडांमधील ताठरपणा कमी होतो. झाड मेल्यासारखे दिसते.

उपाययोजना :

-शेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे. सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी .

-अशी मरग्रस्त कपाशीझाडे आढळल्यास थोडाफार वाफसा येताच झुकलेली झाडांना झुकलेल्या बाजूकडून मातीची भर द्यावी. ती सरळ करून, दोन पायांमध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.

- अशा झाडांच्या बुंध्यापाशी कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक युरिया १५ ग्रॅम अधिक पोटॅश १० ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सि क्लोराईड प्रति २०० लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. पाठीवरील पंपाचे नोझल काढून, प्रत्येत झाडाजवळ साधारण १०० मिलि द्रावण बांगडी पद्धतीने पडेल, असे पाहावे. त्यानंतर झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे.

-आकस्मिक मर रोखण्यासाठी कपाशीच्या शेतात भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी कोळपण्या कराव्यात.

पाऊस उघडिपीनंतर कपाशीचे व्यवस्थापन

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर खालील उपाययोजना कराव्यात.

- पिकातील आंतरमशागतीची कामे स्वच्छ व कोरड्या वातावरणात करावीत.

-बीटी/संकरित कपाशीस सुरवातीच्या काळात येणाऱ्या फुलांचे रूपांतर पात्यात व बोंडात होण्याचे प्रमाण जास्त असते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी व नंतर होणाऱ्या लाल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीद्वारे मुख्य अन्नद्रव्यासोबत दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीही आवश्यक असते. लाल्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशीवर मॅग्नेशिअम सल्फेट १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम अधिक + युरिया १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी. या द्रावणामध्ये कोणत्याही कीडनाशकाचा वापर करू नये.

- कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) किंवा १९:१९:१९ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या अन्नद्रव्यांची ४५ व ६५ व्या दिवशी फवारणी करावी.

फुलोरा अवस्थेत ००:५२:३४ (४ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.

फुलोरा अवस्था, पाते व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) ही फवारणी करावी.

-नैसर्गिक कारणामुळेही कपाशीची पात्या, फुले, बोंडे यांची गळ होते. ती कमी करण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) या वाझ नियंत्रकाची ३ ते ४ मिलि प्रति १० लिटर पाणी अशी पहिली फवारणी करावी. यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.

-कपाशीची कायिक वाढ जास्त होऊन बोंडे कमी लागली असल्यास, क्लोरमेक्वाट क्लोराईड (५० % एस.एल.) या वाढ नियंत्रकाची १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

-कपाशीच्या परिपक्व बोंडाची बाह्य बोंड सड होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा प्रोपीनेब (७० डब्लू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच अंतर्गत बोंड सड रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लू.पी.) २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

-पाऊस उघडिपीनंतर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यावर लक्ष ठेवावे.

------------

डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०

(कपाशी कृषि विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT