Rameshn Chavan Agrowon
ॲग्रो गाईड

Mixed Cropping : प्रयत्नपूर्वक शेतीतून समृद्धी अन् समाधान

२५ एकरांत अपयश, आव्हाने झेलून प्रयत्नपूर्वक व प्रयोगशील वृत्तीतून नारळ, अननस, सुपारी, केळी, जायफळ, कोकम, ऊस अशी समृद्धी तयार केली. आज या शेतीने त्यांचे व कुटुंबाचे आयुष्य समाधानी केले आहे.

एकनाथ पवार

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथील रमेश चव्हाण (Ramesh Chavan) एकेकाळी शासकीय ठेकेदार होते. एके क्षणी मात्र हा व्यवसाय थांबवून पूर्णवेळ शेतीतच मन रमविण्याचे त्यांनी ठरवले. खरेदी केलेल्या २५ एकरांत अपयश, आव्हाने झेलून प्रयत्नपूर्वक व प्रयोगशील वृत्तीतून नारळ, अननस, सुपारी, केळी, जायफळ, कोकम, ऊस अशी समृद्धी तयार केली. आज या शेतीने त्यांचे व कुटुंबाचे आयुष्य समाधानी केले आहे.

वैभववाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टोक मानले जाते. तालुक्यातील वातावरण थोडे कोकण आणि काहीसे घाटमाथ्यावरील असे संमिश्र असते. अलीकडील काळात तालुक्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होऊ लागली आहे. मात्र दहा- बारा वर्षांपूर्वी ही स्थिती अतिशय बिकट होती. अर्थात नाधवडे गाव त्यास अपवाद होते. गावातून बारमाही वाहणाऱ्या उमाळ्यामुळे गोठणा नदी बारमाही वाहते.

त्यामुळेच पर्यटकांचा ओढा असलेला नापणे धबधबा देखील बारमाही ओसंडून वाहतो. याच मार्गावर रस्त्यालगत रमेश श्रीपत चव्हाण यांचे घर आहे. त्यांचे मूळ गाव कुंभवडे असले तरी वीस-बावीस वर्षांपासून ते येथेच स्थायिक झाले आहेत.

शेतीचा दृढनिश्‍चय

रमेश यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. मात्र कुंभवडे येथील शेतीतून पुरेसे अर्थार्जन होत नव्हते. लहान- मोठी कामे तसेच पुढे शासकीय ठेकेदार म्हणून त्यांनी अनेक कामे केली. परंतु या व्यवसायात मन रमत नव्हते. शिवाय आलेल्या कटू अनुभवांमुळे व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्थिरस्थावर असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला. परंतु रमेश यांनी

अन्य कोणत्याही व्यवसायाला पसंती न देता शेतीच करायचा दृढनिश्‍चय केला. नाधवडे- नापणे धबधबा मार्गालगत २५ एकर जमीन खरेदी केली. चढ-उतार आणि झाडाझुडपांची जमीन शेतीयोग्य करण्यास सुरुवात केली. जे करायचे ते उत्तम आणि दर्जेदार हा स्थायी भाव असल्याने जमीन चांगली आकारास येऊ लागली. काही कृषी अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले. संरक्षक कठडे बांधले. चाळीस फूट रुंदीच्या विहिरीचे काम हाती घेतले. दीड किलोमीटरवरील नदीवर पंप बसवून पाइपलाइन काम पूर्ण केले.

नारळ, केळी व आवळा लागवड

पहिल्या वर्षी भुईमूग, भात अशी पिके घेतली. उत्पादन चांगले मिळाले. मग कोणती फळपिके घेता येतील यादृष्टीने माती परीक्षण केले. अहवालानुसार जमीन नारळ लागवडीस उत्तम असल्याची शिफारस मुळदे येथील संशोधन केंद्राचे तत्कालीन अधिकारी दिलीप शिंगरे यांनी केली. मुळदे येथूनच रोपे आणून पाच एकरांत लागवड केली. तीन एकरांत केळी व दोन एकरांत आवळा लागवड केली. केळीचे समाधनाकराक उत्पादन मिळाले नाही. पण वाणबदल व व्यवस्थापन सुधारून चांगले उत्पादन घेतले.

आंतरपिके व अननस

नारळात आंतरपिके घेतल्यास उत्पन्नवाढीला वाव मिळेल या हेतूने जायफळ, सुपारी आदींची लागवड केली. आवळा पिकातून चौथ्या ते पाचव्या वर्षापासून उत्तम दर्जाचे उत्पादन मिळू लागले. माल दर्जेदार होता. पण सुरुवातीची तीन वर्षे चांगला दर मिळाला नाही. नाराज झालेल्या रमेश यांनी मग अननस लागवड करण्याचे ठरविले.

कर्नाटक येथे जाऊन लागवडीविषयी माहिती घेतली. यासाठीही श्री.

शिंगरे यांनी सहकार्य केले. तीन ते चार वर्षे उत्पादन घेतले. सोबतीला उसासारख्या नगदी पिकाची लागवड करून खात्रीशीर उत्पन्नाचा स्रोत तयार केला.

सेंद्रिय पद्धतीवर भर

दूध व शेतीला शेणखत उपलब्ध व्हावे यासाठी म्हशींचे संगोपन सुरू केले. त्यांची संख्या २० पर्यंत नेली. आज म्हशींचे संगोपन थांबवले होत नसले तरी बागेचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर दिला आहे. बागेतील पालापाचोळा, तण जमा करून ते खड्ड्यांमध्ये टाकले जाते. ते कुजल्यानंतर झाडांना दिले जाते.

शेतीतील प्रगती

रमेश यांचा आज शेतीतला किमान २० वर्षांचा झाला आहे. आपल्या पंचवीस एकरांत नारळ २५०, जायफळ १७०, सुपारी ५००, कोकम ४० झाडे, काही प्रमाणात आवळा व १९ एकरांत ऊसशेती अशी समृद्धी तयार केली आहे. सुमारे १५ ते २० हजार नारळांची दरवर्षी विक्री होते. प्रति नग १७ रुपये दर मिळतो. नारळातून सव्वा तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उसाला प्रति टन २९०० रुपये दर मिळतो. सुपारीपासून ४५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. जायफळ, कोकमपासून उत्पादन मिळण्यास अलीकडे सुरुवात झाली आहे. जायपत्रीला सरासरी प्रति किलो २७०० रुपये दर मिळाला आहे. सन २००३-०४ मध्ये विहीर, पाइपलाइन यासाठी जिल्हा बँकेकडून सहा लाख रुपये कर्ज घेतले. त्यानंतर बँकेकडे कायम या रकमेचा ‘सीसी’ आहे. फळांच्या विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्यासाठी जावे लागत नाही. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात.

पुरस्काराने सन्मान

-शेतीत झोकून देण्याची वृत्ती व प्रयोगशीलता यांची दखल घेऊन जिल्हा परिषदेकडून

२००९-१० मध्ये सिंधू शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरव.

-वैभववाडी तालुका खरेदी- विक्री संघामार्फत प्रयोगशील शेतकरी पुरस्कार नुकताच प्रदान.

-कृषी विभाग- आत्मा समितीकडूनहू सत्कार.

-शेतीतील समृद्धी, निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी कृषी अधिकारी सहलीसाठी रमेश यांच्या बागेची निवड करतात. शालेय विद्यार्थ्याच्या सहलीही येतात.

संपर्क ः रमेश चव्हाण, ९८६०३६७०६०, ९४२३५१३८५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT