Beed News: बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी तसेच उन्हाळी धानाची लागवड केली जाते. ज्वारीचे क्षेत्र अत्यल्प असल्याने अनेक शेतकरी या पिकाचा विमा उतरवत नाहीत. सध्या रब्बी हंगामातील पेरणी झालेली आहे. अशातच पीकविमा भरण्यास सुरवात झाली असतानाही शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. .कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांना पीकविमा उतरवण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. तेव्हाच शेतकरी रब्बी हंगामातील आपल्या पिकांना सुरक्षा कवच देऊ शकतील. विशेष म्हणजे, रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान होऊनही कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे. यामुळेच शेतकरी रब्बी हंगामात पीकविमा उतरवण्याकडे दुर्लक्ष करतात, असाही मागील काही वर्षांतील अनुभव आहे. .Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याचे १ लाख ४ हजारांवर अर्ज दाखल.गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना उशिरा मिळाले. काही शेतकऱ्यांना अल्प राशी मिळाल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. खरीप हंगामात जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. परंतु, रब्बी हंगामात उदासीनता दिसून येत आहे..Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज.दरम्यान, ज्वारीचा पीकविमा उतरवण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. आता गहू आणि हरभरा पिकाचा विमा कवच उतरविण्यासाठी १५ डिसेंबर २०२५ अंतिम तारीख असतानाही अल्प प्रतिसाद मिळत आहे..पेरा सर्वाधिकधारूर, केज, पाटोदा या तालुक्यात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचा पेरा सर्वाधिक आहे. मात्र, सर्वात कमी गेवराई तालुका आहेत. या वर्षी जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीकविमा कवच काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.