Pune News: वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी दर कपातीमुळे कच्चा मालाला प्रोत्साहन मिळालं असून देशांतर्गत खतांच्या उत्पादनात सुलभता आली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांच्या दरात कपात झाली आहे, असा दावा केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत उत्तर देताना केला आहे. मध्य प्रदेशचे खासदार बंटी साहू यांनी जीएसटी कपातीचा खतांच्या दरावर काय परिणाम झाला? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री नड्डा यांनी शुक्रवारी (ता.५) लोकसभेत माहिती सादर केली. .लोकसभेत मंत्री नड्डा यांनी सांगितले, "सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांवरील जीएसटी दर कपातीमुळे भाताच्या उत्पादनात १४० रुपये प्रति एकर खर्चात बचत झाली आहे. तसेच ऊसाच्या उत्पादनात प्रति एकर १९९ रुपये, बटाट्यात प्रति एकर ४४६ रुपये आणि गव्हात प्रति एकर १४६ रुपयांचा फरक शेतकऱ्यांना पडला आहे." असा दावा त्यांनी केला..GST Reform: जीएसटी दरातील कपातीमुळे शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार?.केंद्र सरकारने २२ सप्टेंबरपासून देशात जीएसटी दर प्रणालीत कपात केली. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने सुधारित जीएसटी प्रणालीमध्ये ट्रॅक्टवरील जीएसटी दरात कपात केल्याचे नड्डा यांनी नमूद केले. .GST Reforms : ‘जीएसटी’ सुधारणांचा जनतेला दिलासा.मंत्री नड्डा पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांना अवजारांवरील जीएसटी कपातीमुळे ७ ते १३ टक्क्यांचा फायदा होत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला गती मिळणार आहे. तर ३५ एचपीच्या ट्रॅक्टरवर ४१ हजार रुपयांची बचत होत आहे. ४५ एचपीच्या ट्रॅक्टरवर ४५ हजार रुपयांची बचत होत आहे. तर ५० एचपीच्या ट्रॅक्टरवर ६३ हजार रुपयांची बचत होत असून गेल्यावर्षी ९ लाख ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. त्यामुळे सरासरी ४० हजार रुपयांची बचत गृहीत धरली तरी ३ हजार ७८६ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच १ लाख कोटींची बाजारपेठ असलेल्या अवजारांवर ७ टक्के बचत गृहीत धरली तर ७ हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे." असा दावाही त्यांनी केला. .यावेळी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे नड्डा यांनी सांगितले. सल्फरिक अॅसिड, नायट्रेट अॅसिड, अमोनिया यावरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून कपात करून ५ टक्के करण्यात आला आहे. जैव कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. तसेच ट्रॅक्टर आणि अवजारावरील जीएसटी १२ टक्क्यांहून ५ टक्के झाला आहे, असे नड्डा यांनी उत्तरात नमूद केले. दरम्यान, शेतकऱ्यांची शेती आणि शेती संबंधित सर्व प्रकारच्या वस्तूवरील जीएसटी रद्द करावा अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.