रेपो दर ५.५ टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणलाआरबीआयच्या पतधोरणविषयक समितीचा निर्णयकर्ज स्वस्त होणार असून कर्जाचा हप्ताही कमी होणार जीडीपी वाढ ७.३ टक्के राहणार असल्याचा अंदाज.RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरणविषयक समितीने एकमताने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो दर ५.५ टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती आज शुक्रवारी (दि. ५ डिसेंबर) आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी दिली. आरबीआयच्या या निर्णयाने कर्ज स्वस्त होणार असून कर्जाचा हप्ताही (EMI) कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक ३ ते ५ डिसेंबर दरम्यान झाली. यात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती गव्हर्नर मल्होत्रा यांनी आज दिली. पतधोरणविषयक समितीन याआधी सलग दोन वेळा रेपो दरात बदल केला नव्हता. पण आता हा दर ५.५ टक्क्यांवरून ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले..तर, स्थायी ठेव सुविधा (SDF) दर ५.२५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला, तसेच सीमांत स्थायी सुविधा (MSF) दर आणि बँक दर हे दोन्ही ५.७५ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर आणला आहे..CIBIL Mandate: ‘सीबिल’ सक्ती केल्यास आरबीआय, एसएलबीसी करणार कारवाई.पतधोरण समितीने आर्थिक वर्ष २०२६ साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी (GDP ७.३ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आधी ६.८ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. पण आता देशाच्या मजबूत विकास गतीमुळे अधिक जीडीपी वाढीचा अंदाज मांडण्यात आला आहे. .RBI Financial Literacy Week : ‘महिन्याचे बजेट करा, बचत करा स्मार्ट बना’ ‘आरबीआय’कडून आर्थिक साक्षरता सप्ताह.पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रमुख महागाईचा ४ टक्के अथवा त्याखाली राहणे अपेक्षित आहे, मल्होत्रा यांनी म्हटले आहे. उत्पादन क्षेत्रात वेगाने सुधारणा होत आहे. आम्ही नवीन वर्षात अर्थव्यवस्थेत आणखी तेजी येण्याची आशा आणि मोठ्या उत्साहाने मार्गक्रमन करत आहोत. जगभरात प्रतिकूल भू-राजकीय तणाव आणि व्यापार वातावरण असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. .रेपो दर (repo rate) म्हणजे काय?रेपो दर हा एक महत्त्वाचा दर असून ज्याआधारे आरबीआयकडून व्यावसायिक बँकांना कर्ज पुरवठा केला जातो. जर रेपो दरात वाढ झाली तर तर बँकांना आरबीआयकडून कर्ज घेणे अधिक महाग पडते. जर बँकांना आरबीआयकडून अधिक दरात कर्ज मिळाले तर सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होते. याचा सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढतो. परिणामी, गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणे परवडत नाही. रेपो दर आता कमी केल्याने कर्ज स्वस्त होणार असून कर्जाचा हप्ताही कमी होईल. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.