Soybean Pest Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Pest : सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

मराठवाड्यातील सोयाबीन सर्वांत महत्त्वाचे पीक बनले आहे. या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाचे उशिराच्या आगमनाने पेरणीस उशीर झाला होता. जुलै, ऑगस्टमध्ये होत राहिलेला सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.

टीम ॲग्रोवन

डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. ए. जी. लाड, डॉ. योगेश मात्रे

मराठवाड्यातील सोयाबीन (Soybean) सर्वांत महत्त्वाचे पीक बनले आहे. या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाचे उशिराच्या आगमनाने पेरणीस उशीर झाला होता. जुलै, ऑगस्टमध्ये होत राहिलेला सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव (Stem Fly Outbreak On Soybean Crop) वाढल्याचे दिसून येत आहे. या खोडमाशीमुळे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) घट येऊ शकते. जागरूक राहून वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा (Soybean Integrated Pest Management) अवलंब करावा.

खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवणीपासून पुढे कधीही होऊ शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळल्यास त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची दाट शक्यता असते. कारण अळी पान पोखरून शिरेपर्यंत पोहोचते. पुढे शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी दिसते. ही अळी तोंडाच्या बाजूने टोकदार, मागच्या बाजूने गोलाकार व पाय नसलेली अशी असते. या अळीचे डोके सामान्यतः जमिनीच्या दिशेने म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते.

रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तो लवकर लक्षात येत नाही. शेवटी फक्त प्रौढ माशीने निघून जाण्यासाठी केलेले छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. हे झाड बऱ्याचदा शेवटपर्यंत हिरवे राहते, मात्र शेंगा भरत नाहीत. वेळीच उपाययोजना न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

व्यवस्थापन

सोयाबीन पिकांचे कीड व रोगांसाठी वेळोवेळी निरीक्षण, सर्वेक्षण करावे.

पीक तणमुक्त ठेवावे.

खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे ही त्यातील किडीसह नष्ट कराव्यात.

निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१ हजार पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

किडीची आर्थिक नुकसान पातळी : १० ते १५ % प्रादुर्भावग्रस्त झाडे.

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच पुढीलखालील रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

फवारणी (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

थायामेथोक्झाम (१२.६) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा

इथिऑन (५० ईसी) ३ मिलि किंवा

इंडोक्झाकार्ब (१५.८० ईसी) ०.७ मिलि

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.६ मिलि

टीप : कीटकनाशकाचे प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठीचे आहे. फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

डॉ. योगेश मात्रे, ७३८७५२१९५७

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT