Prithviraj Chavan, Nilesh Lanke Agrowon
ॲग्रो गाईड

राज्य सरपंच परिषदेचे पुरस्कार जाहीर

पृथ्वीराज चव्हाण, धस, बंब, लंकेंचा होणार सन्मान

टीम ॲग्रोवन 

नगर ः शेती, (Farmer) सहकार, ग्रामविकासासाठी योगदान दिल्याबद्दल सरपंच (Sarpanch) परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री आमदार सुरेश धस, प्रशांत बंब व नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्शलोक प्रतिनिधी’ पुरस्कार (‘Yashwantrao Chavan Adarshlok Pratinidhi’ Award) जाहीर करण्यात आले आहे. या शिवाय ‘उत्तम प्रशासक’ म्हणून तीन प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व आदर्श ग्रामपंचायतींनाही पुरस्काराने गौरविले जाणार आहे. आदर्शगाव हिवरेबाजार (Hivare Bajar) (ता. नगर) येथे २२ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण होईल.

सरपंच परिषद मुंबई ( Mumbai) यांच्यातर्फे यंदापासून राज्यात ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या, त्यासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, गावे, सरपंच व ग्रामसेवकांना पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, सरचिटणीस विकास पाटील, आबा सोनवणे, अंजना येवले, ज्ञानेश्वर पठारे, नाना डोंगरे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी संचालनालयाचे सह-आयुक्त उज्वल चव्हाण, कृषी (Agriculture) विभागातील सहसंचालक रफिक नाईकवाडी यांचा ‘उत्तम प्रशासक’ म्हणून तसेच राज्यातील दहा सरपंच, पाच आदर्श ग्रामपंचायती व पाच आदर्श ग्रामसेवकांचा गौरव केला जाईल. २२ एप्रिल रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या हस्ते व पद्मश्री पोपटराव पवार (Popat Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Independence Day: ...अन् झेंडा फडकला

Apshinge Military Village : ‘इथे जन्मती वीर जवान’

Indigenous Cows Status: गाय हा उपयुक्त प्राणी!

Farmers Reform: आर्थिक सुधारणांतून उगवेल स्वातंत्र्याची पहाट

Water Conservation: गोकवडीत जलसंधारण, शैक्षणिक सुविधा उभारल्या

SCROLL FOR NEXT