Village Of Soldiers In Maharashtra : पुणे- बंगळूर महामार्गावर साताऱ्यापासून १८ किलोमीटरवरील बोरगावहून पूर्वेस काही मिनिटांच्या अंतरावरच पाच हजारांच्या लोकसंख्येचे अपशिंगे गाव आहे. स्वागत कमानीवरील अपशिंगे (मिलिटरी) हे नाव आणि इथे जन्मती वीर जवान असा उल्लेखच गावाविषयी सर्व काही सांगून जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून गावाने अखंडितपणे ही सैनिकी परंपरा जपली आहे. आझाद हिंद सेनेत गावातील चौघे सहभागी झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात चार सैनिक, १९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात दोन सैनिक आणि १९७१ च्या भारत-बांगलामुक्ती संग्रामात एक जवान शहीद झाला. सन १९९९ च्या कारगिल संघर्षात एक जवान जखमी झाला. पहेलगाम ऑपरेशन’ पर्यंत येथील जवान सैन्यदलात कार्यरत आहेत. .विजयस्तंभ मिरविणारे गावगावाची ख्याती पाहून सैन्यदलाने गावाला युद्धातील रणगाडा भेट दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १४ ऑगस्ट, २०२३ मध्ये ग्रामपंचायतीने शहिदांच्या नावानिशी स्वतंत्र स्मारक उभारून तेथे हा रणगाडा ठेवला आहे. मध्यवर्ती ठिकाणी वीर सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजयस्तंभ उभारला आहे. त्यापासून काही अंतरावरच भैरवनाथ या ग्रामदेवतेचे भव्य मंदिर लोकसहभागातून साकारले आहे. पहिल्या महायुद्धात गावातील ४६ सैनिकांना वीरमरण आले. दुसऱ्या महायुद्धात तब्बल १७७ सैनिकांनी भाग घेतला. .Sugarcane Farming : माजी सैनिकाची आदर्श ऊस शेती .या पराक्रमाने ब्रिटिश अधिकारी प्रभावित झाले. सन २५ सप्टेंबर, १९४५ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड कॉलव्हिन आणि लॉर्ड वेव्हेल यांनी गावाला भेट दिली. आदर्श गावाची दूरदृष्टी असलेली योजना आखली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा, असेंब्ली हॉल, गोदाम, पिण्याच्या पाण्याची विहीर, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा पुरवल्या. त्यातून गावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. गावच्या अतुलनीय योगदानाची दखल ज्येष्ठ मान्यवर कवी कै. ग. दि. माडगूळकर आणि प्रसिद्ध अभिनेते कै. काशिनाथ घाणेकर यांनी घेतली. प्रत्यक्ष भेट व गावातील ज्येष्ठांच्या संवादातून येथे घडती वीर बहाद्दर हा माहितीपट तयार केला. त्यातून गावाच्या शौर्याची आणि त्यागाची यशोगाथा सर्वदूर पोचण्यास मदत झाली..एकाच कुटुंबातील १६ जवान सैन्यातगावात शंकर दगडू निकम यांच्या कुटुंबातील तब्बल १६ सदस्यांनी सैन्यात सेवा बजावली आहे. काही कुटुंबांमध्ये तर बहुतांश सर्व सदस्य सैन्यदलात कार्यरत आहेत. एकाच गावात सुमारे ८५० आजी-माजी सैनिक पाहण्याचे हे दुर्मीळ उदाहरण असावे. ज्यात २० अधिकारी पदावर कार्यरत आहेत. दरवर्षी गावातील २० ते २५ तरुण भारतीय सैन्य दलात भरती होतात. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा अशी पिढ्यान्पिढ्या सैन्यात सेवा देणारी कुटुंबे गावात आहेत. साहजिकच गावाला वेगळी शिस्त निर्माण झाली आहे. येथील तरुणांना लहानपणापासूनच सैन्यदलात भरती होण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. निवृत्त जवान, अधिकारी सामाजिक बांधिलकीतून त्यासाठी पुढे येतात..Soldier Land : सैनिकाची जमीन आणि कूळ.मान्यवरांच्या भेटीस्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख व भारतीय सेनेतील पहिले सर्वोच्चपद लाभलेले फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी गावाला भेट दिली. त्यातून प्रेरणा घेत कर्मवीर कै. भाऊराव पाटील यांनी गावात रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण, कै. गोपीनाथ मुंडे, तसेच सैन्यदलातील विविध उच्चाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही भेट देऊन गावच्या स्मृतीस्तंभास अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ये गाव राष्ट्ररक्षा के लिए ही बनाया गया है असे गौरवोद्गार आपल्या भाषणात काढल्याचे येथील निवृत्त सैनिक अभिमानाने सांगतात. तुषार निकम गावचे विद्यमान सरपंच आहेत..निवृत्त सैनिक साधताहेत शेतीतून प्रगतीसेवानिवृत्त झालेले गावातील बहुतांश जवान आधुनिक शेती व प्रयोगांत रमले आहेत. उरमोडी नदी आणि विहीरीतील पाण्यावर ऊस, सोयाबीन, भात, आले यासह भाजीपाला, पालेभाज्यांची पिके गावात होतात. सुमारे ६० टक्के शेती बागायती तर उर्वरित जिरायती आहे. ऊस आणि आले ही मुख्य पिके आहेत. मजुरांची भेडसवणारी समस्या लक्षात घेता यांत्रिकीकरणावरही भर दिला आहे. ट्रॅक्टर, त्यावर आधारित यंत्रे, बीबीएफ, ठिबक सिंचन आदींचा वापर होतो. उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांकडून माती, पाणी परिक्षण केले जाते. अनेकांनी उसाचे एकरी ८० ते १०० टन ऊस उत्पादन साध्य केले आहे..प्रकाश विलास निकम यांना २०२३-२४ चा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पश्चिम विभागाचा ऊसभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी खोडवा उसाचे २९ गुंठ्यात ६७ टन उत्पादन घेतले आहे. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत टिकवण्यासह उत्पादनवाढीसाठी पाचट, हिरवळीच्या खतांचा वापर करतात. अनेक जवान शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसायात कार्यरत आहेत. गावात सुमारे २०० ते ३०० गाई तर तीनशेच्या वर म्हशीची संख्या आहे. येथील उद्योजक गणेश देशमुख यांकडेही मोठ्या संख्येने विविध जातीच्या गाई आहेत. गावात तीन दूध संकलन केंद्रे असून तेथे हजारो लिटर दूध संकलित होते.तुषार निकम (सरपंच) ९७६७२६२८८८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.