Pune News: भोर तालुक्यातील गोकवडी गावात पाणीटंचाई दूर करून शाश्वत शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक जलसंधारण व शेती विकास प्रकल्प राबविण्यात आला. यासाठी दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत, ‘वनराई’ संस्थेचे सहकार्य मिळाले..या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेनंतर शेतकऱ्यांच्या हस्ते नुकताच औपचारिक हस्तांतर सोहळा पार पडला. या वेळी कंपनीचे प्रतिनिधी दीपक चांदे, सुनील साळुंके यासह वनराईचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पांतर्गत १५ हजार घन मीटर गाळ काढून जलसाठवण क्षमतेत वाढ करण्यात आली. जुन्या जलसाठा संरचनांची दुरुस्ती तसेच नव्या संरचना उभारण्यात आल्या. भूजल पुनर्भरणासाठी समतल चर, जलशोषक चर, फॉर्म बंडिंग यांसारखी क्षेत्र उपचार कामे करण्यात आली..Water Conservation : बीव्हरमुळे तलावाचे पुनरुज्जीवन.आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी मल्चिंग, ठिबक सिंचनयुक्त प्रात्यक्षिक प्लॉट्स उभारले गेले. तसेच बियाणे पेरणी, सेंद्रिय शेती व मृदासंवर्धन यावर भर देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना २,४०० केशर आंबा रोपे वाटप करून फळबाग शेतीला प्रोत्साहन दिले गेले..Water Conservation : वाशीम जिल्हा बनतोय जलसंवर्धनाचा आदर्श .गावकऱ्यांसाठी प्रशिक्षण, संवाद व माहिती-प्रसार उपक्रम राबवून समुदाय सक्षमीकरण साधण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे गोकवडीतील बंजर (नापिक) जमीन शेतीयोग्य बनल्या असून, रब्बी हंगामासह फळबाग शेतीकडे कल वाढला आहे..याशिवाय, भोर तालुक्यातील २२ ग्रामीण शाळांमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविण्याचा संयुक्त उपक्रमही या संस्थेने हाती घेतले आहे. शाळांना संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर, आर ओ पाण्याचे फिल्टर, विज्ञान साहित्य, टेबल-खुर्च्या यांसारख्या आधुनिक साधनांनी सुसज्ज करण्यात आले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.