Micronutrient Deficiency Agrowon
ॲग्रो गाईड

Micronutrient Deficiency : सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेवर विशेष उपाययोजना

जमिनीतून उपलब्ध होणाऱ्या सहा मुलद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांस प्राथमिक अन्नद्रव्ये म्हणतात. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधक या मुलद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात.

Team Agrowon

डॉ.पपिता गौरखेडे, डॉ. सय्यद इस्माईल

जमिनीतून उपलब्ध होणाऱ्या सहा मुलद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांस प्राथमिक अन्नद्रव्ये (Nutrients) म्हणतात. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधक या मुलद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात. लोह, कॉपर मँगेनीज, बोरॉन, जस्त, तांबे, मोलाब्द आणि क्लोरिन या अन्नद्रव्यांची पिकांना अत्यंत कमी प्रमाणात गरज असते. म्हणून या मुलद्रव्यांना सूक्ष्मअन्नद्रव्ये (Micronutrients) असे म्हणतात.

महाराष्ट्रातील ५६.४ टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, ३९.८ टक्के जमिनीत उपलब्ध लोह आणि ५६.७ टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे. मराठवाड्यातील माती परिक्षणाच्या अहवालानुसार ३६.४० टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, २६ टक्के जमिनीत उपलब्ध लोह आणि ३६ टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉनची कमतरता आहे.

मात्र उपलब्ध मॅंगेनीज, तांबे व मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता मराठवाड्यातील जमिनीमध्ये आहे. माती परिक्षण अहवालानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादन आणि शेतीमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य

लोह

वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत.

विविध संप्रेरकांचा घटक असल्यामुळे वनस्पतीतील श्वसन प्रक्रिया आणि प्रकाश संश्लेषण या सर्व प्रक्रिया वनस्पतीची वाढ व पुन:रूत्पादनासाठी आवश्यक.

वनस्पतीतील प्रथिने तयार होणा­च्या प्रक्रियेत आवश्यकता.

लोह वनस्पतीमध्ये अचल स्थितीत असते. त्यामुळे लोहाची कमतरता कोवळ्या पानांवर जाणवते.

कमतरतेची लक्षणे

नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो, शिरा हिरव्या राहतात, हरित लवकाची वाढ खुंटते, कोवळ्या पानांची वाढ थांबते, पाने पांढरी पडून वरच्या बाजूस वाळतात. पाने पातळ होऊन वाळतात.

वनस्पतीमधील प्रथिनांचे प्रमाण कमी होते.

उपाय

०.५ ते १.० टक्के तीव्रतेच्या फेरस सल्फेट ( हिराकस) द्रावणाची फवारणी करावी.

मॅंगेनीज

वनस्पतींमध्ये लोहाचे वहन करण्यास मदत, हरीतद्रव्य तयार करण्यास उपयुक्त.

वनस्पती पेशीमध्ये ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत सहाय्यक.

संप्रेरकाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे वनस्पतीच्या श्वसन क्रियेत आणि हरितद्रव्यातील प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत.

कमतरतेची लक्षणे

नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, पानांमध्ये हरितद्रव्य व हरितलवक कमी होते, पिवळ्या ठिपक्यांचे नंतर पिवळ्या पट्ट्यात रूपांतर होते किंवा जाळीदार शिरांमध्ये करडे डाग पडतात.

उपाय

प्रति हेक्टरी २० ते ३० किलो मॅंगेनीज सल्फेट जमिनीतून द्यावे.

जस्त

अनेक संप्रेरकाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वनस्पतीच्या शरीरातील अनेक प्रक्रियेमध्ये उदा.ऑक्सिजनशी संयोग पावणे, हरितद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी कार्ये व्यवस्थितपणे पार पाडली जातात.

वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे काही संजिवके तयार करण्याच्या प्रक्रियेत जस्ताची मदत होते.

ठराविक वनस्पतींच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत जस्ताची मदत होते.

कमतरतेची लक्षणे

पाने पिवळी पडतात. पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील उती मरतात.

शेंडयाकडील पाने खुजी होतात. पालवीवर पांढरे चट्टे येतात, पालवी तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाची दिसते. - खोड वाढते, पाने पक्व होण्यापूर्वी गळतात. साल खडबडीत व टणक होऊन चकाकते.

उपाय

०.५ ते १ टक्के तिव्रतेच्या जस्त सल्फेटची फवारणी करावी.

तांबे

अमिनो अॅसीड आणि प्रथिनांशी संयोग पावून अनेक प्रकारची संयुगे तयार होतात.

वनस्पतीच्या शरीरात ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत जी संप्रेरके मदत करतात त्या संप्रेरकामध्ये तांबे इलेक्ट्रॉन घटक म्हणून कार्य करते.

हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत लोहाचा वापर अधिक कार्यक्षमपणे करण्यास मदत करते.

कमतरतेची लक्षणे

पानांचा आकार बारीक होऊन चुरगळतात, कडा करपतात.

शेंडेमर झालेल्या फांदीवर अनेक फुटवे फुटून लहान पानांचा झुपका तयार होतो, मुळांवर गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते.

उपाय

०.४ टक्का कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचुदाच्या द्रावणाची फवारणी द्यावी.

- डॉ. पपिता गौरखेडे,

८००७७४५६६६

(मृद्‌ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT