Soybean Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Production : सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

Soybean Crop : तालुक्यातील काही शिवारात सोयाबीन पीक फुलांमध्ये आले असून मागील पंधरवड्यात पाऊस न झाल्याने त्यावर आघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Soybean News : अहमदपूर, जि. लातूर : तालुक्यातील काही शिवारात सोयाबीन पीक फुलांमध्ये आले असून मागील पंधरवड्यात पाऊस न झाल्याने त्यावर आघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


तालुक्यात ७१ हजार ९९३ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी सर्वाधिक ४२ हजार ८१२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. त्या खालोखाल ८ हजार ६९२ तूर तर काही ठिकाणी मूग व उडीद याची पेरणी केली आहे.

यंदा पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावली तीही अल्प प्रमाणात परंतु पेरणीस बराच कालावधी झाल्याच्या चिंतेने कांही शेतकऱ्यांनी २७ जून पासून पडलेल्या पावसावर पेरणी केली. पुढील काळात उघडीत व तुरळक पाऊस अशा बाबी घडत गेल्या व तालुक्यातील पेरणी जुलै अखेरपर्यंत चालली.

तालुक्यातील २७ जून रोजी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फुल लागली आहे.मागील पंधरवड्यात पावसाने दडी दिल्याने या फुलावर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालाच नसून तालुक्यातील सर्व तलावातील पाणीसाठा अत्यल्प प्रमाणात आहे.

शहरातील सर्व पिकांना सध्या पावसाची अत्यंत गरज असून मागील पंधरवडा पूर्णपणे कोरडा गेल्याने जमिनीला भेगा पडत असून पिके अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फुले लागली असून त्या फुलावर परिणाम होत आहे.

आपले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू असून पाण्याची सोय असलेले शेतकरी तुषार माध्यमातून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season : कर्नाटकचा ‘गनिमी कावा’

Soybean Procurement : हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच

Sugar Market : दिवाळीमुळे देशाअंतर्गत साखर बाजारातील तेजी स्थिर

MPKV Rahuri :" महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रियेवर ‘बोट’

Sugarcane Season : ऊसदरासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

SCROLL FOR NEXT