Relief For Manikrao Kokate: नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे..सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी आज न्यायमूर्ती राजेश लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. बनावट कागदपत्रे सादर करुन दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या शासकीय सदनिका लाटल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे. .Manikrao Kokate Resigns: अखेर कोकाटेंना मंत्रीपद सोडावं लागलं, त्यांचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला.न्यायमूर्ती लढ्ढा यांच्या न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. पण, त्यांना अटकेपासून दिलासा दिला. कोकाटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. रवी कदम यांनी युक्तिवाद केला. ज्यावेळी त्यांनी घरासाठी अर्ज केला तेव्हा त्यांचे महिन्याचे उत्पन्न केवळ २,५०० रुपये होते. यामुळे ते नियमांनुसार पात्र होते, असा दावा कोकाटेंच्या वकिलांकडून करण्यात आला. .Manikrao Kokate: मंत्री कोकाटे यांची दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम.सोमवार, मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा, अशी कोकाटेंच्या वकिलांची न्यायालयाकडे मागणी केली. १९९४ च्या उत्पन्नानुसार घर घेतले. घराचा ताबा मिळवण्यासाठी उशीर झाला. घर घेतल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढल्याचा युक्तिवाद करण्यात आला. .त्यांना कलम ४६३ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. कागदपत्रांवर कोकाटे यांच्याच स्वाक्षऱ्या आहेत. कोणी आपल्याच स्वाक्षरीची फोर्जरी कशी करु शकतो? ही माहिती चुकीची असू शकते. पण यामुळे फोर्जरी होऊ शकत नाही, असा युक्तिवाद अॅड. रवी कदम यांनी केला. .कोकाटेंचे किती होते वार्षिक उत्पन्न?समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनेचा लाभ घेऊन कोकाटेंनी सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. केवळ ३० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येत होता. पण कोकाटे आणि त्यांचा भाऊ विजय यांनी सदनिका मिळविण्यासाठी त्यांचे वार्षिक उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा कमी असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. त्यानंतर त्यांनी दोन सदनिका मिळवल्याचा आरोप आहे.त्यावेळी कोकाटे यांचा वकिली व्यवसाय आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा अधिक होते. त्यांच्या वडिलांची २५ एकर शेतजमीन असून, कोकाटे त्यातून पिकवलेला ऊस स्थानिक कारखान्यांना पाठवत होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न चांगले होते, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या सर्व उत्पन्नाची माहिती कोकाटे यांनी त्यावेळी उघड केली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.