Soybean
Soybean Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean : शेतकरी पीक नियोजन : सोयाबीन

टीम ॲग्रोवन

शेतकरी ः भास्कर बाळासाहेब मेथे

गाव ः कापसी खुर्द, ता. लोहा, जि. नांदेड

सोयाबीन क्षेत्र ः ७७ एकर

सोयाबीन ः तूर आंतरपीक ः ५० एकर

---------------

लोहा तालुक्यातील कापसी खुर्द शिवारात भास्कर मेथे यांची ७७ एकर शेती आहे. भास्कर २००३ -२००४ पासून दरवर्षी संपूर्ण क्षेत्रावर सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) करतात. सुमारे ४५ ते ५० एकरांवर सोयाबीन (Soybean) आणि तूर (Tur), तर उर्वरित क्षेत्रावर सलग सोयाबीनची ते लागवड करतात. यंदा सुमारे ५० एकरावर सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक (Tur Inter Crop In Soybean) घेतले आहे. उत्पादन खर्च आणि मजूर खर्च यांचा ताळमेळ लागत नसल्याने शेतीकामांसाठी जास्तीत जास्त यांत्रिकीकरणावर भर देत असल्याचे भास्कर सांगतात.

वाण निवड ः

पेरणीसाठी साधारण ६० टक्के बियाणे घरचे वापरले जाते. उर्वरित बियाणे विकतचे वापरले जाते. सुमारे ७७ एकरांवर सोयाबीन लागवडीसाठी विविध वाणांची निवड केली जाते. त्यानुसार एमएयूएस ७१, एमएयूएस २२८, एमएयूएस १५८, जेएस-३३५, रुची १००१ आणि जेएस ९३०५ हे वाण लागवडीसाठी वापरले जातात.

दरवर्षी पेरणीपूर्वी बियाणांची उगवण चाचणी घेऊन उगवणक्षमता तपासली जाते. पेरणीपूर्वी बियाण्यास फक्त रासायनिक बीजप्रक्रिया केली जाते. जैविक बीजप्रक्रिया करण्याचे टाळतो, असे भास्कर आवर्जून सांगतात.

लागवड क्षेत्र ः

एमएयूएस ७१ ः १६ ते १७ एकर

एमएयूएस २२८ ः ४ ते ५ एकर

एमएयूएस १५८ ः ३ एकर

रुची १००१ ः १४ एकर

जेएस ९३०५ ः ९ एकर

जेएस-३३५ ः उर्वरित संपूर्ण क्षेत्रावर

मागील कामकाज ः

- रब्बीतील पीक निघाल्यानंतर साधारण जानेवारी महिन्यात ट्रॅक्टरने जमीन चांगली नांगरणी केली. नंतर रोटाव्हेटर फिरवून शेतातील काडीकचरा गोळा करून शेत स्वच्छ केले.

- नांगरटीनंतर २०ः२०ः०ः१३ (अमोनिअम फॉस्फेट सल्फेट) ५० किलो, दाणेदार गंधक ५ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ८ किलो प्रति एकर प्रमाणात दिले.

- गोठ्यातील दोन जनावरांचे शेणखताचा वापर काही क्षेत्रामध्ये केला जातो. त्यानुसार ५ टन शेणखत शेतात पसरून घेतले.

- पेरणीपूर्वी बियाण्यांस रासायनिक बीजप्रक्रिया करून घेतली.

- साधारण २५ ते ३० जून या कालावधीत ट्रॅक्टरचलित सात दात्याच्या पेरणी यंत्राने पेरणी केली आहे. त्यानुसार ६ ओळी सोयाबीन आणि १ ओळ तूर याप्रमाणे पेरणी केली. ट्रॅक्टरचलित सात दात्याच्या पेरणी यंत्राने पेरणी केल्यामुळे तूर पिकाच्या बाजूची ओळ रिकामी राहते. तुरीच्या बाजूची ओळ रिकामी राहिल्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच पिकाचे निरीक्षण करणे देखील सोपे होते.

आगामी नियोजन ः

- पेरणी होऊन १५ दिवसांचे झाले असून, सोयाबीन पिकाची उगवण चांगली झाली आहे.

- पेरणीवेळी योग्य नियोजन केल्यामुळे विरळणी करण्याची आवश्यकता सहसा भासत नाही. त्यामुळे मजुरी खर्चातही बचत होते असे भास्कर सांगतात.

- पीक २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर तणनियंत्रणासाठी तणनाशकांची फवारणी केली जाईल. त्यानंतर १० दिवसांनी १ कोळपणी करून पीक तणविरहित केले जाईल.

- वाढीच्या अवस्थेत पिकांवर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करून आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे फवारणी केली जाईल.

सिंचन व्यवस्थापन ः

सिंचनाच्या पाण्याच्या अभावामुळे जास्ती करून क्षेत्रावरील उत्पादन

हे पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. सिंचनासाठी त्यांच्याकडे २ बोअर असून, त्यातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास फक्त २० एकर क्षेत्र ओलिताखाली आणले जाते.

- भास्कर मेथे, ९८९०२५११७७

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT