सौंदाळा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या गावाचा एकी व वैशिष्ट्यपूर्ण, नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी नावलौकिक झाला आहे. जलसंधारणाची विविध कामे करून गावाने पाणीटंचाई दूर केली. शेती व पूरक व्यवसायांना चालना दिली. कन्यादान उपक्रम, विधवांचा सन्मान, शाळेचा विकास, शिव्याबंदी व दररोज दोन तास मोबाईल बंदी आदी उपक्रमांमुळे गाव राज्यातील अन्य गावांसाठी दिशादर्शक ठरले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात नेवासा-शेवगाव रस्त्यावर अडीच हजार लोकसंख्येचे सौंदाळा गाव आहे. शिवारात उसासह कापूस, कांदा, तूर आदी पिके घेतली जात असून, काही प्रमाणात मुळा धरणाचे पाणी उपलब्ध होते, तरीही अनेक वेळा गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागायचे. शरदराव बाबूराव आरगडे दोन वर्षांपासून गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीतून जलसंधारणाच्या कामांद्वारे पाणीसमस्या दूर करायचे ठरवले. उपसरपंच भिवसेन गरड तसेच ग्रामपंचायत सदस्य इंदूबाई आरगडे, छाया आरगडे, भीमाराज अढागळे, लक्ष्मण चामुटे, सुरेखा आरगडे, कोमल आरगडे, गणेश आरगडे, जिजाबाई बोधक व ग्रामसेवक श्रीमती पी. जी. पिसोटे यांनी त्यांना साथ दिली. .विहिरींच्या पाणीपातळीत वाढतीन वर्षांपूर्वी गावशिवारातील ओढ्यात जलयुक्त शिवार अभियानातून पाच वेगवेगळ्या ठिकाणी सहा मीटर रुंद, पन्नास मीटर लांब व दहा फूट खोली या क्षेत्रफळाचे चर खोदण्यात आले. त्यात शंभर फुटांपर्यंत दोन बोअर्स घेतले. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी त्यात जिरले. त्याचा परिणाम पुढे असा झाला त्या चरांच्या आसपास विहिरींच्या पातळीत कमालीची वाढ झाली. फेब्रुवारी, मार्चमध्ये कोरड्या पडणाऱ्या विहिरींना मेपर्यंत बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले. दोन वर्षांपूर्वी शिवारातील सर्व ओढ्यांमध्ये पाणी जिरवण्यासाठी वीस- तीस फूट अंतर ठेवून तीन किलोमीटरवर शंभर बोअर्स घेऊन ‘रिचार्ज बोअर’ उपक्रम राबवण्यात आला. त्यातूनही परिसरातील चारशेंच्या आसपास विहिरींच्या.Rural Development: पांगरी महादेवमध्ये अखेर प्रशासनाची पाहणी.पाणीपातळीत वाढ झाली. रोजगार हमी योजनेतून बांधावर पाच बाय पाच फूट आकाराचा खड्डा खोदून पाणी जिरविण्यासाठी ‘जलतारा’ उपक्रम राबवण्यात आला. लोकसहभाग व लोकवर्गणीला जलयुक्त शिवार अभियानाची जोड देत जुन्या गावतलावातील गाळ काढण्यात आला. उपसलेला गाळ शेतकरी आपल्या जमिनींसाठी घेऊन गेले. पाणी समितीचे अध्यक्ष गणेश आरगडे यांच्यासह गावकरी, महिलांनी सर्व कामांसाठी पुढाकार घेतला..शेतीचे बदलले चित्रपाणीसमस्या दूर होऊ लागल्याने शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली आहे. गाव परिसरात ७०५ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. शंभर १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चारापिके घेतली जातात. दोनशे हेक्टरवरील ऊस लागवड चारशे हेक्टरवर गेली आहे. फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. अडीचशेच्या आसपास पशुपालक असून एक हजारांपेक्षा अधिक जनावरांची संख्या आहे. शिवारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ऊस पाचट न जाळता त्याची तसेच कापसाच्या अवशेषाचीही कुट्टी करून त्याचा वापर केला जातो. सेंद्रिय निविष्ठांच्या वापराने गावातील जमीन सुपीक होण्यास मदत होत आहे..Rural Development: ग्रामीण व्यवस्था सुधारण्यासाठी डोळस साहित्याची गरज.महिलांचा सन्मान करणारे गावसौंदाळे हे उपक्रमशील गाव आहे. करमाळा (जि. सोलापूर) भागात महिलांच्या सन्मानासाठी कार्य करणारे प्रमोद झिंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा महिलांसाठी पाच वर्षांपासून पुनर्विवाह योजना राबवली जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ११ हजारांची मदत दिली जाते. एक विवाह या उपक्रमातून लावला आहे. ध्वजारोहणाचा मान महिलांना देण्यात येतो. शंभरहून अधिक महिला (विशेषतः वृद्ध) भाऊबीज, रक्षाबंधनावेळी एक हजाराची मदत देण्यात आली. गरजू ७३ मुलांच्या पाचवीपर्यतचा शिक्षणाचा खर्च उचलून शैक्षणिक साहित्य दिले जाते. गावातील मुलींना ग्रामपंचायतीकडून पाच हजारांची मदत देत कन्यादान योजना राबवली जाते. गावातील एका अनाथ कुटुंबाची जेवणाची व्यवस्था केली जाते. हे काम विधवा महिलांना दिल्याने त्यांना त्यातून रोजगार प्राप्त झाला आहे. लग्नात हुंडा घेणाऱ्यांना पाच हजारांचा दंड केला जातो..सौंदाळ्यातील विशेष उपक्रमपाच वर्षांपासून दिवाळीला प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखरेची भेट.सर्व कुटुंबांकडून शौचालयाचा अनेक वर्षांपासून वापर.पिठाच्या गिरणीतून एक रुपये प्रति किलो प्रमाणे ना नफा न तोटा या तत्त्वावर गिरणीची सोय.वैयक्तिकरीत्या शंभर कुटुंबांना प्रति सहा हजारांत पीठगिरणी उपलब्ध करून देण्यात आली.‘आरओ’ तंत्राचे वीस लिटर पाणी अवघ्या पाच रुपयांत उपलब्ध.आठवड्यातून एक दिवस तरुण, महिला, गावकऱ्यांचे श्रमदान, स्वच्छता.अल्पसंख्याक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ११ हजारांची मदत..Rural Development: ग्राम विकासात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोठे योगदान: प्रतापराव जाधव .शिवारात सुमारे तीन हजार वृक्षांची लागवड.गरजूंना जुने कपडे उपलब्ध होण्यासाठी माणुसकीची भिंत.शाळा, ग्रामपंचायतीमधील सर्व विद्युत उपकरणे सौरऊर्जेवर चालतात. त्यातून वीजबिल रकमेत बचत.सन २००७ मध्ये ज्येष्ठ नेते बाबासाहेब आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील तंटे मिटल्याने गावाला मिळाले तंटामुक्त अभियानाचे पारितोषिक.तीन वर्षांपासून गाव परिसरात सुमारे २९ सीसीटीव्हींची नजर.पन्नास टक्के दरात सलूनची सोय.पावणेतीनशे गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ देत तालुक्यात गाव अव्वल.गाव अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण. लोकवर्गणीतून मंदिर, स्मशानभूमीचे सुशोभीकरण.आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना सावलीसाठी छत्रीवाटप..भोंगा वाजल्यास मोबाइल बंदसध्याच्या युगात तरुण पिढी विशेषतः विद्यार्थी मोबाइलच्या आहारी गेले आहेत. घरातील संवादही त्यामुळे कमी झाला आहे. त्यामुळे सायंकाळी ७ ते ९ या काळात मोबाइल वापरायचा नाही असा ठराव झाला आहे. भोंगा वाजतो आणि पुढील दोन तास गाव विनामोबाइल वावरत असल्याचे दिसून येते..शहरातील मुले सौंदाळ्याच्या शाळेतलोकसहभागातून गावातील पाचवीपर्यंत असलेली जिल्हा परिषदेची शाळा आदर्श झाली आहे. येथे १९३ विद्यार्थी असून, परिसरातील गावांतील शंभरांपेक्षा अधिक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आधुनिक ‘एलईडी’ तंत्रावर त्यांना शिकवण्यात येते. दिवाळी, उन्हाळ्यातही शाळेला सुट्टी न देतात अध्यापन सुरू ठेवण्यावर भर असतो. मुख्याध्यापक पोपट घुले म्हणाले की येथे आठ शिक्षक आहेत. खेड्याकडून शिक्षणासाठी मुले शहरात जात असताना आमच्या इथे उलट प्रकार आहे. येथे शहरातून मुले शालेय शिक्षणासाठी येतात. यंदा ‘नवोदय’ साठी नऊ तर शिष्यवृत्तींसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक २० मुलांची निवड झाली. लोकांच्या उत्साहातून गावांतील भिंतींवर शालेय अभ्यासक्रम रेखाटला आहे..गावात शिव्या ऐकू येत नाहीतविविध कारणांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यास त्यात महिलांचा अवमान होतो. त्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत घेण्यात आला आहे. गावांतील दर्शनी भागात ठिकठिकाणी तसे फलक लावले आहेत. आतापर्यंत शिवी देणाऱ्या १२ व्यक्तींकडून दंड वसूल केला आहे. त्यामुळे शिवी देण्याचे धाडस कोणी करत नाही. त्याची थेट ग्रामपंचायतीकडे तक्रार केली जाते.शरदराव आरगडे (सरपंच) ९०२१५८७७१७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.