Milk Product Agrowon
ॲग्रो गाईड

शिंगाडा पिठाचे मूल्यवर्धित पेढे

शिंगाड्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आणि दुधाची पोषक तत्त्वे लक्षात घेता दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीला संधी आहे.

टीम ॲग्रोवन

शिंगाडा किंवा पाणीफळ (Water Fruits) हे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील प्रसिद्ध फळ (Fruits) आहे. शिंगाड्यामध्ये प्रति जैविक, प्रतिविषाणू, अँटिऑक्सिडंट आणि शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढण्याचे गुणधर्म आहेत. तसेच कर्करोग, मूत्रविकार, रक्तसंबंधी रोग, पोटाचे विकार, यकृत व प्लीहाचे आजार (Blood, urinary tract diseases, blood diseases, stomach disorders, barley nation and leprosy) आणि कुष्ठरोग या आजाराबाबत प्रतिकारशक्ती तयार होते. कावीळ, अतिसारावर उपयुक्त इलाज आहे.

आरोग्यदायी घटक ः
१) शिंगाड्यात दुधापेक्षा २२ टक्के जास्त खनिजे, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व-अ, ई, ब (ब१,ब२,ब६) आणि ‘क’ ही पौष्टिक तत्त्वे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. यातील आयोडीन आणि मॅंगेनीज रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
२) शिंगाडे हे साबुदाणा आणि तांदळापेक्षा (Rice) अधिक पौष्टिक आहेत. शिंगाडे सुकवून पीठ तयार करतात. पिठापासून स्वादिष्ट खीर, पुरी, दशम्या, लाडू, (Kheer, Puri, Dashamya, Laddu,)आणि शिरा बनवितात. शिंगाड्याचे रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीराला पोषण मिळून शरीराची झीज भरून निघते.


शिंगाड्यामधील पोषक घटक :
पोषक घटक - प्रति १०० ग्रॅम
पाणी - ११.४
कर्बोदके - ७६.२
ऊर्जा - ३६२ (कि. कॅलरी)
स्निग्ध पदार्थ - ३.०७
प्रथिने - ६.१
तंतुमय पदार्थ - २.०
कॅल्शिअम - ५०
फॉस्फरस - १६४
लोह - ३.२
खनिजे - २.१
सोडिअम - २.६
पोटॅशिअम - ८४७
जीवनसत्त्व - ब१ (थायमीन) - ०.२३
जीवनसत्त्व – ब३ (नायासीन) - १०
जीवनसत्त्व – ब१२ (रॉयबोफ्लॅविन) - ०.३७

शिंगाड्याचे फायदे :
१) याचा रस सेवन केल्यास भूक वाढते. मळमळीपासून आराम मिळतो.
२) अतिसार आणि हगवणकरिता उपयुक्त इलाज आहे.
३) बियांची भुकटी खोकल्यासाठी व पायांच्या भेगासाठी उपयुक्त.
४) फॅट आणि सोडिअमचे प्रमाण कमी.
५) कोलेस्टेरॉल फ्री, ऊर्जा आणि तंतुमय घटकांचा उत्तम स्रोत.
३) पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, जस्त (Potassium, Calcium, Iron, Zinc)


आणि फॉस्फरसचे जास्त प्रमाण.
दिवसेंदिवस स्निग्ध पदार्थ आणि बॅड कोलेस्ट्रॉल यांच्या सेवनामुळे स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाब आजाराचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेऊन शिंगाड्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आणि दुधाचे पोषक तत्त्वे लक्षात घेता दुग्धजन्य पदार्थात मूल्यवर्धन करून पदार्थ बनवण्याची गरज आहे.
खवा निर्मिती प्रक्रिया
१) मोठ्या आकाराच्या कढईत ४ ते ५ लिटर म्हशीचे (६ टक्के फॅट) किंवा गायीचे (४.५ टक्के फॅट) दूध घेऊन तापवावे.
२) उकळत असताना लांब दांड्याच्या उलथण्याने दूध सतत हलवावे, म्हणजे दुधावर साय येत नाही. त्यातील घनघटक एकजिनसी राहतात.
३) उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन दूध घट्ट होऊ लागते. हळूहळू त्याची द्रवरूप अवस्था संपत असल्याचे दिसून येते. अशा अवस्थेत कढई खालील उष्णतेचे प्रमाण कमी करावे. कढईतील घट्ट दूध उलथण्याने वेगाने हलवावे.
४) ज्या क्षणी कढईतील खवा तळ आणि बाजूला चिकटतो आणि खव्याचा गोळा तयार झाला, की उष्णता देण्याचे बंद करावे. खवा कढईतील आतल्या अंगास मोकळा पसरून ठेवावा.
५) खवा थंड झाल्यावर पुन्हा एकत्र गोळा करून तो स्वच्छ भांड्यात किंवा पार्चमेंट पेपरमध्ये गुंडाळून थंड जागी ठेवावा.


पेढे बनविण्याची प्रक्रिया :
१) कढईमध्ये खवा मोजून घेऊन त्याला ९० अंश सेल्सिअसपर्यंत तापवावा. त्यामध्ये खव्याच्या वजनाच्या ५ टक्के भाजलेल्या शिंगाड्याचे पीठ मिसळावे.
२) खव्याच्या वजनाच्या ३० टक्के दळलेली साखर (Sugar) आणि वेलची पूड व्यवस्थित मिसळावी.
हे मिश्रण मोठ्या कढईत धूरविरहित चुलीवर किंवा गॅसवर ठेवून मंद उष्णतेवर गरम करत असताना
उलतथण्याच्या साह्याने फिरवावे.
३) मिश्रण एकजीव झाल्यावर त्याला एका थाळीत काढून थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड आणि स्थिर झाल्यानंतर तळहाताच्या साह्याने २० ते २५ ग्रॅमचे गोळे तयार करून पेढे तयार करावेत.
त्यावर पिस्त्याचे लहान तुकडे लावावेत. तयार झालेले पेढे ५ अंश सेल्सिअसला साठवावेत.

मूल्यवर्धित शिंगाडा पेढ्याचे फायदे ः
१) शिंगाड्याचे गुणधर्म लक्षात घेता दुग्धजन्य (Milk) पदार्थांत मूल्यवर्धन केल्यास महाराष्ट्रातील इतर भागात शिंगाडा लागवडीस चालना मिळेल.
२) दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन केल्यास दूध उत्पादकांना जास्त मोबदला मिळेल.
३) शिंगाडा पिठाचा वापर केल्यास पेढ्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादन खर्चात बचत.

संपर्क ः तुषार मेश्राम, ७३०४१६८९२९
(कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT