Amravati News : कापसाच्या नोंदणीची प्रक्रिया एक महिना उशिराने सुरू करणाऱ्या ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)कडून अद्यापही पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. या व्यवहारात शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याने ‘सीसीआय’कडून खरेदी तत्काळ सुरू व्हावी, अशी मागणी धामणगाव रेल्वे बाजार समितीच्या सभापती कविता गावंडे यांनी केली आहे. .खासदार अमर काळे, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह सीसीआय महाव्यवस्थापक, अमरावती जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, दरवर्षी कापूस हंगामाची जाणीव ठेवत दिवाळीपूर्वी ‘सीसीआय’कडून कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानुसार खरेदी केंद्रेही उघडली जातात. कापूस विक्रीतून आलेल्या पैशाच्या माध्यमातून शेतकरी दिवाळीसाठीच्या खर्चाची तजवीज करतात..खानदेशात खरेदीअभावी सोयाबीन, मका उत्पादकांना फटका.त्यासोबतच रब्बी हंगामाकरिता लागणाऱ्या पैशाची सोयदेखील कापूस विक्रीच्या पैशातूनच होते. यंदा मात्र नवे काही तरी करण्याच्या नादात ‘सीसीआय’ने कपास किसान अॅपचा पर्याय नोंदणीकरिता दिला. या अॅपवर नोंदणीसाठी दिवाळीनंतर सुरुवात करण्यात आली. त्यामुळे कापूस विक्री आपसूकच एक महिना लांबणीवर पडली. त्यातच अनेक शेतकऱ्यांना नोंदणीत अडचणी आल्या. त्यांच्या निराकरणासाठी कोणतीच यंत्रणा सीसीआयकडे नव्हती. बाजार समित्यांवरच हा भार टाकण्यात आला. .Cotton Rate: आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत बाजारांत कापसाच्या भावात नरमाई.आता नोंदणी प्रकिया बऱ्याच अंशी पार पडली असतानादेखील खरेदीसाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून पैशाची निकड लक्षात घेता त्यांच्याद्वारे खुल्या बाजारात कापूस विक्रीवर भर दिला जात आहे. खुल्या बाजारात ६५०० ते ७ हजार रुपये या दराने कापसाचे व्यवहार होत आहेत. या व्यवहारात शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल १ हजार ते १५०० रुपयांनी नुकसान होत असल्याने याची दखल घेत ‘सीसीआय’ खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणीदेखील गावंडे यांनी केली आहे..सीसीआयने कृषी विभागाचा हवाला देत जिल्हानिहाय्यय पीक उत्पादकता विचारात घेत हेक्टरी कापूस खरेदीची मर्यादा जाहीर केली आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यात हेक्टरी ३० क्विंटलची मर्यादा असताना आता ती १९ क्विंटलपर्यंत खाली आणली आहे. आधीच कापसाला खुल्या बाजारात दर नाही. त्यातच ‘सीसीआय’देखील कापूस खरेदी मर्यादित करणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार आहे.कविता गावंडे, सभापती, बाजार समिती, धामणगाव रेल्वे, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.