Bihar Election Results 2025: बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने २०० हून अधिक जागा मिळवत अभूतपूर्व यश मिळवले. तर विरोधी महागठबंधनचा सुपडासाफ झाला. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप ९० जागा, संयुक्त जनता दल (JD(U)) ८४, राष्ट्रीय जनता दल (RJD) २५, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJPRV) १९, काँग्रेस ६, एआयएमआयएम ५ जागांवर आघाडीवर होता..संयुक्त जनता दलाचे Janata Dal (United) प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०२५ च्या बिहार निवडणुकीत सर्वात मोठा विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. विशेष म्हणजे त्यांनी २० वर्षांत सत्ताविरोधी लाटेचा प्रभावीपणे सामना केला. ते जवळपास दोन दशके सत्तेत आहेत. पण त्यांचा या निवडणुकीत हा स्पष्ट बहुमताचा विजय आहे. .Bihar Election 2025: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! खात्यात १० हजार, १० व्यांदा नितीश कुमार; लाडक्या बहिणींनी NDAला तारलं .यासह, नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना रोखण्यात यश मिळवले. गेल्या निवडणुकीत तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल (RJD) सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यावेळी आरजेडीला केवळ २५ जागांवर निर्णायक आघाडी घेता आली. नितीश कुमार यांच्या विरोधात सत्ताविरोधी लाट असताना, मतदारांनी 'मोदी की गॅरंटी' च्या बाजूने कौल दिल्याचे दिसून आले..Sanjay Raut on Bihar Election results: 'त्यांना ५० च्या आत संपवले!' बिहार निकालावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया.या निवडणुकीत मतदारांचा मोठा सहभाग दिसून आला. महिला आणि तरुण मतदारांच्या जोरदार पाठिंब्याच्या जोरावर 'एनडीए'ने या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे राजकीय जाणकार सांगतात..मोठ्या विजयानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रियाया विजयानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ''२०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत देऊन राज्यातील जनतेने आमच्या सरकारप्रति विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी, राज्यातील सर्व मतदारांना माझे नमन आणि मनापासून आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. एनडीएने या निवडणुकीत एकजूट दाखवत भरघोस बहुमत मिळवले. या प्रचंड विजयाबद्दल एनडीएतील सर्व मित्र चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांचेही आभार. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, बिहार आणखी प्रगती करेल आणि देशातील सर्वात विकसित राज्यांच्या यादीत त्याचा समावेश होईल.'' अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. .बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो - पंतप्रधान मोदी हा सुशासन, विकास, लोककल्याणाची भावना आणि सामाजिक न्यायाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ''२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाचा आशीर्वाद दिल्याबद्दल मी बिहारमधील माझ्या जनतेचे मनापासून आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनतेची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नवीन संकल्पासह काम करण्यास शक्ती प्रदान करेल.'' असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. बिहारमधील निवडणुकीतील प्रचंड यशानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. येथे पीएम मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. बिहारच्या जनतेने विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केले. निवडणूक प्रचारादरम्यान, मी बिहारच्या जनतेला विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले होते आणि बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले. बिहारने २०१० नंतर एनडीएला सर्वात मोठा जनादेश दिला. एनडीएतील सर्व मित्र पक्षांच्या वतीने, मी बिहारच्या जनतेचे नम्रपणे आभार मानतो. मी त्यांना आदरपूर्वक नमन करतो, असे मोदी म्हणाले. .'एनडीए'चा हा ऐतिहासिक विजय- जेपी नड्डाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बिहार निवडणुकीतील एनडीएचा विजय हा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी धोरणांवर जनतेच्या विश्वासाचे हे शिक्कामोर्तब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. .बिहारमधील आपच्या बंधू-भगिनींनी महागठबंधनच्या जंगलराज आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे नाकारले. तर त्यांनी एनडीएच्या सुशासन, स्थिरता आणि विकासाचे स्वागत केले आहे. हा अभूतपूर्व जनादेश 'विकसित बिहार - विकसित भारत' हा आमचा संकल्पाला साकार करण्यास नवी गती देईल, असा विश्वास नड्डा यांनी एक्सवरील पोस्टमधून व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.