पूर्व विदर्भात उन्हाळी हंगामात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल जात. मात्र सलग उन्हाळीनंतर खरिपात भात पीक (Kharif Paddy Crop) घेतल्यामुळ खरिपात भात पिकावर किडींचा प्रादूर्भाव वाढतो. व्यवस्थापन खर्च वाढतो.
त्याच प्रमाणे उन्हाळी भाताला (Summer Paddy Crop) अधिक पाणी लागत. उन्हाळी भाताला पर्याय म्हणून उन्हाळी तीळ घेण फायदेशीर ठरत.
महाराष्ट्रात तिळाच पीक (Sesamum Crop) खरीप, अर्ध रब्बी व उन्हाळी हंगामात घेतल जात. खरीप हंगामात मॉन्सूनच्या लहरीपणामुळ नुकसान होत असल्याने शेतकरी उन्हाळी हंगामातील पिकाला प्राधान्य देतात.
तसेच या तिळाची प्रत विशेषतः रंग पांढराशुभ्र राहिल्यामुळे दरही चांगला मिळतो.
तीळ हे कमी दिवसांत येणार पीक असून, सलग, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही घेता येत. या पिकास २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत. पाणी साचून ठेवणाऱ्या जमिनी या पिकास मानवत नाहीत.
पेरणीपुर्वी जमीन चांगली तयार करावी. उभी-आडवी नांगरून चांगली भुसभुशीत करावी. काडी-कचरा वेचून शेत स्वच्छ कराव.
उभळ (पटाल) फिरवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेल शेणखत टाकून जमिनीत मिसळाव.
तीळ बियाणे बारीक असल्यामुळ पेरणी करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पूर्व विदर्भातील जमिनीमध्ये भात पिकानंतर अन्य पिके घेताना जमिनीत निघालेली ढेकळे बारीक करून घ्यावीत.
अन्यथा, तीळ बियाणे वर मातीचे ढेकूळ विरघळून दाबले जाते आणि उगवण होत नाही.
लागवडीसाठी तिळाच्या जे.एल.टी -४०८-२ आणि ए.के.टी. १०१ या सुधारित जातींची निवड करावी.
बियाण्यापासून व जमिनीमधून बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम ४ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळाव.
त्यानंतर पेरणीपूर्वी अॅझोटोबॅक्टर + पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रति किलो प्रत्येकी याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करावी. पेरणी शक्यतो बैल पाभरीने ३० बाय १५ सें.मी. किंवा ४५ बाय १० सें.मी. अंतरावर करावी.
पेरणी करताना बियाणे २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे जास्त खोलवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो.
पेरणीनंतर ८-१० दिवसांनी पहिली विरळणी, तर दुसरी १५-२० दिवसांनी करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या २.२२ लाख प्रति हेक्टर इतकी ठेवावी.
त्यासाठी ४५ सें.मी. अंतरावर पेरणी केलेली असेल तर दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे तर ३० सें.मी. अंतरावर पेरणी केलेली असेल तर दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. इतके ठेवून विरळणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.