Pomegranate Farming agrowon
ॲग्रो गाईड

Pomegranate Farming : शेतकरी नियोजन : डाळिंब

सोलापूर जिल्ह्यातील महुद बुद्रुक (ता. सांगोला) येथे विक्रांत खांडेकर यांची ३५ एकर शेतजमीन आहे. त्यात दहा एकरांवर डाळिंबाची ३ हजार झाडे आहेत. उर्वरित क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट, पपई, मका, तूर, घास या पिकांची लागवड आहे.

टीम अॅग्रोवन.

सोलापूर जिल्ह्यातील महुद बुद्रुक (ता. सांगोला) येथे विक्रांत खांडेकर यांची ३५ एकर शेतजमीन आहे. त्यात दहा एकरांवर डाळिंबाची (Pomegranate) ३ हजार झाडे आहेत. उर्वरित क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट, पपई, मका, तूर, घास या पिकांची लागवड आहे.

मागील २० वर्षांपासून ते डाळिंब बागेत हस्त आणि आंबिया हे दोनच बहर धरतात. दरवर्षी हस्त आणि आंबिया बहराचे प्रत्येकी ५ एकर क्षेत्रावर नियोजन केले जाते. प्रत्येक बहराचे योग्य नियोजन करून कामे केली जातात. बागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन आदी बाबींवर विशेष लक्ष दिले जाते.

यंदा हस्त बहरातील बागेत पावसामुळे मोठे नुकसान झाले. तेलकट डाग आणि कुजवा रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आला. त्यात सुमारे ५० टक्के नुकसान झाले. त्यामुळे सध्या अंबिया बहरावर लक्ष केंद्रित केले आहे.

आंबिया बहराचे नियोजन

आंबिया बहर धरताना पावसामुळे बागेस अपेक्षित ताण बसत नाही. त्यासाठी एक ऑक्टोबरला संजीवके व ०ः५२ः३४ ची फवारणी करून पानगळ केली.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या आलटून-पालटून फवारण्या घेतल्या. यंदा पाऊस जास्त प्रमाणात झाला. ऐन पानगळीच्या काळातच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात वॉटरशूट आले. मागील १५ दिवसांपूर्वी ते काढून घेतले. पालवी फुटतेवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली. सूत्रकृमींच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकरी एक लिटर प्रमाणे ह्युमिक ॲसिडचा वापर केला आहे.

ठिबकद्वारे विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या

सध्या बाग कळी अवस्थेत आहे कळीचा बहर चांगला दिसण्यास सुरुवात झाली आहे. फुलकिडे, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेण्याचे काम सुरू आहे. पाकळी कुजवा, काळपट डाग या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना बुरशीनाशकांची फवारणी घेतली.

स्लरीसोबत पीएसबी, केएसबीची मात्रा दिली जाईल. सध्या थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि पाऊस जास्त झाल्यामुळे सिंचनाच्या पाण्याचे प्रमाण कमी ठेवले आहे. वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल. थंडीमुळे बागेत लवकर सेटिंग होण्यासाठी ॲमिनो ॲसिड आणि काळ्या गुळाची स्लरी दर आठवड्याला देत आहे. दर १० दिवसांनी १५ किलो शेण, ५ लिटर गोमूत्र, २ किलो हरभराडाळीचे पीठ, २ किलो गूळ यांचे मिश्रण करून ते १० दिवस आंबवून ठेवले जाते. त्यानंतर २०० लिटर पाण्यातून स्लरीद्वारे दिले जाते.

- विक्रांत खांडेकर,

९९७०८२८२४८

(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

आगामी नियोजन

येत्या काळात मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. आवश्यकतेनुसार आणखी फवारणी केली जाईल. बाग कळी अवस्थेत असल्याने सिंचनावर विशेष लक्ष दिले आहे. जास्त प्रमाणात पाणी सिंचन होणार नाही याची काळजी घेत आहे. आवश्यकतेनुसार एक दिवसाआड किमान १ तास ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.पुढील १५ दिवसांत खोडावर बोर्डो पेस्ट लावणार आहे. जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आणि पोत सुधारण्यासाठी ठिबकद्वारे व्हर्मिवॉश सोडले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT