Turmeric Agrowon
ॲग्रो गाईड

हळदीसाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

हळदीसाठी इनलाइन ड्रीप पद्धती वापरावी. सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह योग्य पद्धतीने असावा.

टीम ॲग्रोवन

हळदीची उत्तम वाढ आणि उत्पादनासाठी उत्कृष्ट निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. ५.५ ते ७.५ दरम्यान सामू असणारी, उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली गाळाची जमीन हळदीच्या उत्तम वाढीसाठी उपयुक्त असते. अति भारी, काळी चिकण मातीयुक्त, क्षारयुक्त व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये, कारण कंदकूज व कंदमाशीचा प्रादुर्भाव होतो. दगडगोटे असलेली व मुरमाची जमीन टाळावी. उत्तम उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस, भरपूर फुटवा होण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस, कंद तयार होण्यासाठी २० ते २५ अंश सेल्सिअस आणि कंद वाढीसाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.

१) लागवडीसाठी जमीन नांगरून, वखरून चांगली भुसभुशीत करावी. गादीवाफे तयार करावेत. लागवड मे, जून महिन्यात तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस असताना करावी. उशिरा लागवड केल्यास उगवण कमी होते, उत्पादनावर परिणाम होतो.

२) कालावधी, उत्पादकता आणि कुरकुमीनचे प्रमाण लक्षात घेऊन निरोगी दर्जेदार बेणे निवडावे. बेणे गट्टू किंवा कांडीचे निवडावे. कांडीचे बेणे निवडल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. बेणे ३० ते ४० ग्रॅम वजनाचे व डोळे फुगलेले असावे.

३) लागवडीसाठी अलेप्पी, प्रतिभा, प्रभा, वायगाव, कडप्पा, राजापुरी, कृष्णा, सेलम, फुले स्वरूपा या जातींची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करावी.

ठिबक सिंचनाचे नियोजन ः

१) मुळांशी योग्य ओलावा राखल्याने लवकर व एकसमान उगवण होऊन वाढ जोमदारपणे होते. पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळांच्या कक्षेत दिली गेल्याने त्यांचा पुरेपूर वापर होतो. मजुरी तसेच पाण्यात ५० टक्के, खतामध्ये ३० टक्के बचत होते. उत्पादनात ३५ ते ४० टक्यांनी वाढ होते.

३) कंद व कायिक वाढीवर नियंत्रण ठेवता येते. जमिनीतील पाणी, हवा यांचा समतोल राखला जातो.

४) दाब नियंत्रित ठिबक सिंचनाचा वापर करून चढ,उताराच्या जमिनी लागवडीखाली येतात.

५) हळदीच्या मुळांशी योग्य ओलावा असावा. प्रमाणापेक्षा जास्त ओलावा झाल्यास कंदकुजीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर जाणवतो.

६) इनलाइन ड्रीप पद्धती वापरावी. सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह खालीलप्रमाणे असावा.

जमिनीचा प्रकार---हलकी-कमी खोली---मध्यम खोली ते जास्त खोल भारी जमीन --जास्त खोल भारी जमीन

ठिबक नळीतील अंतर---४ फूट---४.५ फूट---५ फूट

ड्रीपरमधील अंतर---३० सेंमी.---४० सेंमी.---५० सेंमी.

ड्रीपरचा ताशी प्रवाह---१ लिटर /तास---२ लिटर /तास---२ ते ३ लिटर /तास

पाणी व्यवस्थापन ः

ठिबक सिंचनासाठी पाण्याची गरज ः

पाण्याची गरज (मिमी.) = बाष्पीभवन (मिमी./दिन) × पीक गुणांक × बाष्पपात्र गुणांक

दर एकरी पाण्याची गरज = एकराचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) × प्रति दिन पाण्याची गरज

उदा. बाष्पीभवन (मिमी./दिन) जर ६ मिमी. असेल आणि पीक

गुणांक ०.५ व बाष्पपात्र गुणांक जर ०.८ धरला तर एकरी पाण्याची गरज (लिटर/दिन) = ६ × ०.५ × ०.८ × ४००० = ९६०० लिटर.

ठिबक सिंचनासाठी पाण्याची गरज ः

वाढीची अवस्था---दिवस ---महिना ---पाण्याची गरज (मिमी.)---पाण्याची गरज (लिटर / दिन/ एकर)

उगवण---१ ते २५---जून---३.५---१४०००

सुरुवातीची वाढीची अवस्था---२६ ते ७०---जुलै – ऑगस्ट ---४.५---१८०००

फुटवा होणे---७१ ते ९०---ऑगस्ट – सप्टेंबर ---५.५---२२०००

कंद तयार होणे---९१ ते १२०---सप्टेंबर- ऑक्टोबर ---६---२४०००

कंद वाढ---१२१ ते १९०---नोव्हेंबर-डिसेंबर ---५.८---२३२००

पक्वता ते काढणी---१९१ ते २३०---जानेवारी-फेब्रुवारी ---३---१२०००

टीप ः आपल्या विभागातील तापमान आणि बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते.

ठिबकद्वारे खते नियोजन :

१) मुळाच्या कक्षेतच खते दिली जातात. खते वाया जात नाहीत.

२) जमिनीमध्ये हवा, अन्न आणि पाणी याचा योग्य समतोल राखला जातो. जमीन कायमस्वरूपी वाफसा अवस्थेत राहते. खते वापराच्या क्षमतेत वाढ होते. योग्य खते योग्य वेळी दिली जातात

३) कमी पीपीएम पातळीची खते जास्त परिणामकारक असतात. त्याचे जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते.

दररोज आणि वारंवार खते दिल्याने उत्पादनात वाढ होते.

४) योग्य वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची गरज असते, त्यामुळे योग्य खत व्यवस्थापन करायचे असेल तर वाढीच्या अवस्थेनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी देणे फारच गरजेचे आहे.

५) खत व्यवस्थापन करण्यापूर्वी माती परीक्षण करावे. जेणेकरून कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जमिनीचा सामू किती आहे याचा अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार खताचे नियोजन करता येते.

एकरी खत व्यवस्थापन

लावणी अगोदर ः

१) शेणखत ः १० टन

२) डी ए पी ः ५० किलो

३) सिंगल सुपर फॉस्फेट ः २२५ किलो

४) मॅग्नेशिअम सल्फेट ः २५ किलो

५) सूक्ष्म अन्नद्रव्ये ः १० किलो

लागवडीनंतरची खतमात्रा ः

लागवडीनंतरचे दिवस---एकूण दिवस---किलो / एकर

युरिया---अमोनिअम सल्फेट---१२: ६१:००---०:०:५०---१३:०: ४५

३० ते ६०---३०---३०---४५---७.५---१५---७.५

६१ ते ९०---३०---३०---३०---७.५---१५---७.५

९१ ते १२०---३०---७.५---३०---७.५---७.५---७.५

१२१ ते १५०---३०---१५-----------------४५---७.५

१५१ ते १८०---३०-----------------------६०

एकूण---८२.५---१०५---२२.५---१४२.५---३०

टीप ः माती परीक्षण अहवालानुसार ६० ते १५० दिवस प्रति आठवडा ३ किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा ०.५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.

संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२ (प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT