Green Chili
Green Chili Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : मिरचीवरील कीड व रोगनियंत्रण

टीम ॲग्रोवन

डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. संजय कोळसे

प्रमुख किडी ः

१) फुलकिडे

- फुलकिडे पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडावरील बाजूस वळतात.

- शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला प्रादुर्भाव आढळतो.

- पाने लहान होतात. यालाच बोकड्या किंवा चुरडा-मुरडा असे म्हणतात.

नियंत्रण ः

निळे चिकट सापळे एकरी १२ प्रमाणे वापरावेत.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- ॲसिटामिप्रीड (२० टक्के एस.पी.) १ ग्रॅम

- फेनपायरॉक्झिमेट (५ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा

- सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) २ मिलि

२) तुडतुडे

- प्रौढ व पिले पानांतील रस शोषतात.

- जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात. झाडांची वाढ खुंटते.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- पायरीप्रॉक्सिफेन (१० टक्के ई.सी.) १ मिलि किंवा

- ब्रोफ्लॅनिलीड (२० टक्के एस.सी.) ०.२५ ग्रॅम किंवा

- इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.एस.) ०.७ मिलि

३) पांढरी माशी ः

- पानांतील रस शोषण करते. पाने पिवळी पडून करपली जातात.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- फेनप्रोपॅथ्रीन (३० टक्के ई.सी.) ०.५ मिलि किंवा

- हॅक्झिथिअझोक्स (३.५ टक्के) अधिक डायफेन्थुरॉन (४२ टक्के डब्ल्यू.डी.जी.) (संयुक्त कीटकनाशक) १.५ ग्रॅम

४ ) मावा ः

- कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषतात. त्यामुळे नवीन पालवी येणे थांबते.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- फिप्रोनील (०.५ टक्के एस.सी.) १.५ मिलि किंवा

- स्पायरोटेट्रामॅट (१५.३१ ओ.डी.) २ मिलि किंवा

- टोलफेनपाइराड (१५ टक्के ई.सी.) २ मिलि किंवा

५) कोळी ः

- कीड पानातील रस शोषून घेते.

- पानांच्या कडा खाली वळतात, पानांचे देठ लांबतात.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- इथिऑन (५० टक्के ई.सी.) ०.५ मिलि किंवा

- प्रॉपरगाईट (५७ टक्के ई.सी.) २.५ मिलि किंवा

रोग ः

१) फळकुज, फांद्या वाळणे, पानावरील ठिपके ः

- पाने आणि फळांवर वर्तुळाकार गोल डाग पडतात.

- सुरुवातीला शेंडे मरतात, नंतर झाड सुकते.

- पाने, फांद्या आणि फळांवर काळे चट्टे तयार होतात, अशी फळे कुजतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- ॲझोक्झिस्ट्रोबीन (२३ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा

- क्रेसॉक्सिम मिथाईल (४४.३ टक्के इसी) १.५ मिलि किंवा

- ॲझोक्झिस्ट्रोबीन (११ टक्के एस.सी.) अधिक टेब्युकोनॅझोल (१८.३ टक्के एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि.

३) पानावरील ठिपके

रोगकारक बुरशी ः सरकोस्पोरा, अल्टरनेरिया.

- पानांवर राखाडी लालसर तपकिरी कडा असलेले ठिपके उमटतात. कालांतराने पाने पिवळी पडून गळतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- हेक्झाकोनॅझोल (७५ टक्के डब्ल्यू.जी.) १.५ ग्रॅम किंवा

- ॲझोक्झिस्ट्रोबीन (८.३ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६६.७ टक्के डब्ल्यू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम

४) पानांवरील जिवाणूजन्य ठिपके ः

- सुरुवातीला लाल करड्या रंगाचा ठिपके पडतात. नंतर ठिपके काळ्या मोठ्या आकारात रूपांतरित होऊन त्यांच्या कडा पिवळ्या होतात.

- पाने पिवळी पडून गळतात. खोड व फांद्या वाळतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- हेक्झाकोनॅझोल (७५% डब्ल्यू.जी.) १.५ ग्रॅम किंवा

- कार्बेन्डाझिम (१२ %) अधिक मॅन्कोझेब (६३ % डब्लूपी) १.५ ग्रॅम किंवा

- फ्लूबेंडीअमाईड (३.५%) अधिक हेक्झाकोनॅझोल (५% डब्ल्यू.जी.) ३ ग्रॅम.

६) भुरी ः

- पानावर पिवळे ठिपके पडतात. पानाच्या खालील बाजूस पांढरी पावडर आढळते.

- रोगग्रस्त भाग आकसतो व पाने गळतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- ॲझोक्झिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि किंवा

- फ्लूबेन्डामाइड (३.५ टक्के) अधिक हेक्झाकोनॅझोल (५ टक्के डब्ल्यू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम

५) चुरडा मुरडा (लीफ कर्ल)

- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे, तुडतुडे व मावा या रसशोषक किडींमार्फत होतो.

- कीड पानांतील अन्नरस शोषते. त्यामुळे शिरांमध्ये सुरकुत्या पडून पानाची वाढ खुंटते.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

- कीड नियंत्रणामध्ये दिलेल्या रासायनिक कीटकनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

-------------------

- डॉ. अनिकेत चंदनशिवे, ९८९०१६३०२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT