Soybean Pest Management Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Pest Management : सोयाबीन पिकातील किडींचे नियंत्रण

सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी या पतंगवर्गीय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Team Agrowon

सध्या सोयाबीन (Soybean) पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी या पतंगवर्गीय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास सोयाबीन उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. या किडींच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राने पुढील सल्ला दिला आहे.

कीडींचे रासायनिक नियंत्रण कसं कराल?

क्लोरअॅट्रानिलीप्रोल (१८.५ %) ६० मिली किंवा

पूर्वमिश्रित कीडनाशक थायामिथोक्झाम (१२.६%) + लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (९.५ %) ५० मिली किंवा

पूर्वमिश्रित कीडनाशक क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (९.३ %) + लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (४.६ %) ८० मिली किंवा

टेट्रानिलीप्रोल (१८.१८% ) १०० ते १२० मिली किंवा

पूर्वमिश्रित कीडनाशक बिटा सायफ्ल्युथ्रीन (८.४९ %) + इमिडाक्लोप्रीड (१९.८१ %) १४० मिली

वरिल कोणत्याही एका कीडनाशकाची २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वरिल कीडनाशके सर्व प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारस करण्यात आले आहे. त्यामुळे किडीनुसार वेगळे-वेगळे कीडनाशक फवारण्याची आवश्यकता नाही. फवारणी करताना पाण्याचे प्रमाण शिफारशितच वापरावे. कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT