Cotton Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Disease : कपाशीतील मर रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ खंडानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतातील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत याला आकस्मिक मर असे म्हणतात.

Team Agrowon

बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ खंडानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे (Heavy Rain) कपाशीच्या (Cotton) शेतातील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत याला आकस्मिक मर (Wilt Disease) असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण  (Water Stress) पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. पाणी दिल्यानंतर किंवा मोठा पाऊस पडल्यानंतर ३६ ते ४८ तासात आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कापूस संशोधन केंद्र, नांदेड आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी येथील तज्ज्ञांनी पुढील सल्ला दिला आहे.

उपाययोजना काय आहेत?

- अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा. वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.

- लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी. द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. 

सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर  म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT