Grape Disease Management
Grape Disease Management Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Disease Management : द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. सुजॉय साहा, स्नेहा भोसले, ऋषिकेश भोसले

सध्या सर्वच भागातील द्राक्ष बागा (Vineyard) मणी सेटिंगच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. सध्या वातावरणात (Climate Fluctuation) खूप तफावत जाणवत आहे. बऱ्याचशा भागांत दिवसाचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान (Temperature) १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आढळून येत आहे.

पहाटे पडणाऱ्या दवामुळे बागेमध्ये आर्द्रतेचे (Vineyard Humidity) प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. जास्त कॅनॉपी असलेल्या ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत नाही.

अशावेळी पानांवर व घडांमध्ये दव पडून बराच काळ ओलावा राहिल्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दाट कॅनॉपी असलेल्या ठिकाणी फवारणीचे योग्य कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे भुरी रोगावर प्रभावी नियंत्रण मिळत नाही.

रोग नियंत्रण

अ) निर्यातक्षम बागांमध्ये...

निर्यातक्षम बागांमध्ये द्राक्ष वाढीच्या अवस्थेत (छाटणीच्या ५० दिवसांनंतर) रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीची शिफारस नसते. फवारणी केल्यास द्राक्षामध्ये बुरशीनाशकांचे अंश सापडून नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करावा.

काढणीच्या अवस्थेतील द्राक्ष घडावर सल्फर (४० एससी) ३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या फॉर्म्यूलेशनच्या वापरामुळे द्राक्षमण्यावर सल्फर फवारणीमुळे पडणारे पांढरे डाग कमी राहण्यास मदत होईल.

तसेच जैविक नियंत्रकांचा वापर केल्यास बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी होण्यास मदत होते. ॲम्पिलोमायसीस क्विसक्वॅलीस ५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. सोबतच पोटॅशिअम बायकार्बोनेट ५ ग्रॅम किंवा कायटोसॅन ३ ग्रॅम यांचा प्रतिलिटर पाण्यातून वापर करावा.

सध्या पडणाऱ्या थंडीमुळे बऱ्याचशा द्राक्ष बागांमध्ये पेपर रॅप केले आहे. या काळात घडामध्ये आर्द्रता वाढून भुरीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बागेचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे.

उशिरा छाटणी झालेल्या बागांमध्ये भुरीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सल्फरची फवारणी करावी. या फवारणीनंतर काढणीपर्यंतच्या काळात बॅसिलस सबटिलिस २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे दोन फवारण्या कराव्यात. यामुळे द्राक्षावरील बुरशीनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होईल.

ब) स्थानिक बाजारपेठेसाठी उत्पादन घेणाऱ्या बागेत (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

 हेक्झाकोनॅझोल (५ इसी) १ मिलि किंवा

 डायफेनोकोनॅझोल (२५ इसी) ०.५ ग्रॅम किंवा

 टेट्राकोनॅझोल (३.८ इडब्ल्यू) ०.७५ मिलि किंवा

 सायफ्लुफेनॅमिड (५ टक्के इडब्ल्यू) ०.५ ग्रॅम किंवा

 फ्लुओपायरम (२०० एससी) अधिक टेब्युकोनॅझोल (२००एससी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.५६३ मिलि किंवा

 फ्लुक्झापायरॉक्झाईड (७५ ग्रॅम प्रति लिटर) अधिक डायफेनोकोनॅझोल (५० ग्रॅम प्रति लिटर) एसएसी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.८ मिलि किंवा

 पॉलिऑक्सिन डी झिंक सॉल्ट (५ टक्के एससी) ०.६ प्रति लिटर या प्रमाणे वापर करावा.

 ट्राय अझोल वर्गातील बुरशीनाशकांचा प्रभाव वाढविण्यासाठी फवारणी मिश्रणात पोटॅशिअम बायकार्बोनेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे वापर करावा.

घ्यावयाची काळजी

 बुरशीनाशक फवारणी कव्हरेज व्यवस्थितरीत्या होण्यासाठी द्राक्षघडांचा लोड योग्य राखणे आवश्यक आहे.

 बुरशीनाशके आणि जैव नियंत्रण घटक यांचे मिश्रण करू नये.

 झाडावरील ताण कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जमिनीतील आर्द्रता इष्टतम असावी.

 बागेमध्ये भुरीच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास, द्राक्षघडांमधील देठांवर देखील फवारणी होईल याची काळजी घ्यावी. यासाठी फवारणी डबल गनद्वारे करून द्राक्षघड पूर्णपणे धुऊन घ्यावा.

काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव

 या वर्षी बागांमध्ये डिसेंबर महिन्यामध्येच काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळून येत आहे. काळ्या बुरशीचा लागण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आढळून येते. परंतु सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव लवकर झालेला दिसून येत आहे.

 काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर व मण्यांवर काळ्या रंगाची पावडर दिसून येते. त्यामुळे द्राक्षांचा दर्जा खालावतो व निर्यातीस अडचणी येतात.

 प्रादुर्भावग्रस्त बागांमधील घड,

सिलिकॉनयुक्त सरफॅक्टन्ट ०.३ मिलि प्रति लिटर या प्रमाणे द्रावण करून प्रादुर्भाव झालेले घड धुऊन काढावेत.

- डॉ. सुजॉय साहा, ९४५०३ ९४०५३, (प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : शेती प्रश्नांवरही धार्मिक ध्रुवीकरणाचा मोदींचा डाव !

Unauthorized Cotton Seeds : अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी करू नये

Water Issue : उमटेतील साठवण क्षमता निम्‍मी

Sugar Industry : साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आर्थिक विकासाला बळ देईल

Tomato Rate : टोमॅटो दरातून उत्पादन खर्चही निघेना; १०० रुपये क्रेट दरानं विक्री

SCROLL FOR NEXT