Education Agrowon
ॲग्रो गाईड

Indian Education : आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग

Team Agrowon

प्रा. विजय नवले

आयटीआय

या नावानेच प्रचलित असलेल्या ट्रेडचे नाव ‘इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (Industrial Training Institute). दहावीनंतरचे हे ट्रेड विषयाच्या आवाक्यानुसार एक किंवा दोन वर्षांचे असतात. त्याची अर्हताही ट्रेडनुसार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण अशी आहे.

किमान वयोमर्यादा १४ वर्षे असून, प्रवेशासाठी वयाची कमाल मर्यादा नाही. म्हणजेच दहावीनंतर बऱ्याच कालखंडानंतरही आयटीआय करणे शक्य आहे. याचे शुल्कही अत्यंत कमी असते.

१) दहावीनंतर दोन वर्षांचे कोर्सेस : मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, सिव्हिल ड्राफ्ट्समन, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, मोटर मेकॅनिक, रेडिओ-टीव्ही मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आदी दहावीनंतर दोन वर्षांचे कोर्सेस आहेत.

तर डिझेल मेकॅनिक, ड्रेस मेकिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, हेअर अँड स्कीन केअर, कमर्शिअल आर्ट, शीट मेटल वर्किंग इ.

२) बारावीनंतर एक वर्षाचे कोर्सेस : कॉम्प्युटर ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, डीटीपी ऑपरेटर, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, आर्किटेक्चरल असिस्टंट, गवंडी काम, सॅनिटरी इन्स्पेक्टर, मल्टिमीडिया ॲनिमेशन इ.

३) बारावीनंतर दोन वर्षांचे कोर्सेस : सर्व्हेअर, हार्डवेअर नेटवर्किंग, गोल्ड स्मिथ, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट, ॲग्रिकल्चर मशिनरी मेकॅनिक इ.

आयटीआयनंतर कारखान्यांमध्ये नोकरीची शक्यता जास्त असल्याने ग्रामीण भागातील मुलामुलींचा याकडे ओढा असतो. संबंधित ट्रेडचे ज्ञान, कौशल्य आणि काही वर्षांचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास पगारही चांगला मिळू शकतो.

थोड्या अनुभवानंतर स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्याही संधी उपलब्ध आहेत. आयटीआयनंतर पुढील शिक्षण घ्यावयाचे असल्यास ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ला संबंधित शाखेला प्रवेश मिळू शकतो.

डिप्लोमा इंजिनिअरिंग

दहावीनंतर ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ म्हणजेच ‘पॉलिटेक्निक’ला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळू शकतो. दहावी उत्तीर्ण एवढीच अट आहे. शासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये दहावीच्या गुणांवर डिप्लोमा प्रथम वर्षाला, तर बारावी (सायन्स)नंतर दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो.

शासकीय तंत्रनिकेतनमधील शुल्क अल्प असते. खासगी संस्थांमध्ये शुल्क सवलतीच्या आणि शिष्यवृत्तीच्या शासकीय योजना उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांनाही दिलासा मिळू शकतो.

मेकॅनिकल, संगणक, आयटी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, ऑटोमोबाइल आदी शाखांमधून तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स करता येतो.

हा कोर्स केल्यावर अभियांत्रिकी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. यात उत्तीर्णांना औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. तसेच संरक्षक दलांतसुद्धा पदविकाधारकांना संधी असते.

इंजिनिअरिंग / अभियांत्रिकी पदवी

बारावी (सायन्स) पीसीएम, अर्थात मॅथेमॅटिक्ससह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीला (बी.ई. /बी.टेक) प्रवेश मिळू शकतो. हा चार वर्षांचा पूर्ण वेळ कोर्स असून, त्यासाठी एमएचटी सीईटी परीक्षा अनिवार्य आहे.

महाराष्ट्रात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. मेकॅनिकल, संगणक, आयटी, सिव्हिल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ईएनटीसी, पॉलिमर, ॲग्रिकल्चर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, ऑटोमोबाइल आदी शाखांमधून बी.ई. /बीटेकला प्रवेश मिळू शकतो.

अभ्यासक्रमाचे शुल्क दरवर्षी लाखभराचे म्हणजेच जरा जास्त आहे. शासकीय नियमांप्रमाणे आरक्षित तसेच आर्थिक दुर्बल घटकांना शुल्क सवलतींचा लाभ होतो. उत्तम नोकरी मिळण्याच्या शक्यता जरा जास्त आहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांतील मुले आणि मुलींनी मागील वीस तीस वर्षांत इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मोठी प्रगती केली आहे. विशेषतः साधारण परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. देश-विदेशांमध्ये करियरच्या उन्नत संधी या अभ्यासक्रमानंतर मिळतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT