Thane News: मे पहिन्यापासून पावसाने ठाणे जिल्ह्यात धुवाधार बरसत १०८ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरी जिल्ह्यातील वातावरण हिरवेगार असून, वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध आहे. .ठाणे पालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत तीन हजार ३०७ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५० मिमी पाऊस कमी नोंदवला गेला आहे. हवामान बदलामुळे मे महिन्यापासूनच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. ऊन-पावसाचा खेळ रंगात असताना जून ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली होती..Water Storage : कृष्णा खोऱ्यात धरणांत पाणीसाठा मुबलक.गणपतीच नव्हे तर नवरात्री, दिवाळीवरही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आता नोव्हेंबर महिना उजाडला तरी पावसाची रिपरिप सुरूच आहे. रोज पावसाची हजेरी लागत असल्याने ठाणेकर आता बेजार झाले आहेत. दुसरीकडे शेतीचेही नुकसान झाले असून, हाताशी आलेले धान्य कुजण्याच्या मार्गावर आहे..कोकण विभागात दमदार खेळीकोकण विभागात ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण विभागात सरासरीपेक्षा पर्जन्यमान ९८ टक्क्यांवर मर्यादित राहिले असताना ठाणे जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला आहे. ठाणे जिल्ह्यात सरासरी २५०५ मिमी पावसाच्या तुलनेत २७०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणातून पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे..Water Storage: रब्बीची चिंता मिटली! देशातील प्रमुख धरणांत ९० टक्के पाणीसाठा.तालुकानिहाय पाऊस मिमीमध्येतालुका सरासरी एकूण पाऊसटक्केठाणे२४८८२९३८११८अंबरनाथ२०६०२६२४१२७उल्हासनगर२१५३२५९५१२०मुरबाड२६२४२८५७१०८भिवंडी२४५५२६२२१०६कल्याण२५१६२५६७१०२शहापूर२४३९२६०९१०७.हलक्या सरींची शक्यताहवामान खात्याच्या अंदाजानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.