
Kolhapur News : भविष्यात शेतकऱ्यांची मुले शास्त्रज्ञ व्हावीत, चांगले अभियंते व्हावीत, म्हणून पुढील वर्षापासून अभियांत्रिकी शिक्षण हे मराठीतून होईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी केली.
कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सव उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कृषी आयुक्तालय (पुणे) ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, ‘रामेती’चे प्राचार्य उमेश पाटील, राशिवडेच्या सरपंच संजिवनी पाटील आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, की शेती अडचणीत आहे, असे म्हणण्यापेक्षा भविष्यात शेतीच्या प्रत्येक मालावर प्रक्रिया उद्योग उभारायला हवेत. गवताच्या शेतीतून इथेनॉल होईल, उसाच्या शेतीतून अनेक जोडधंदे उभे करता येतील.
केवळ साखर नव्हे तर उसाच्या रसाचे मार्केटिंग आणि काजूच्या बोंडातून ज्यूस निर्माण करण्याची कल्पना या मातीत रुजली पाहिजे. त्यासाठी पारंपरिक शेती पद्धत बाजूला ठेवून नव्या पिढीने संशोधक बनायला हवे.
‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, माजी संचालक पी. डी. धुंदरे, कृष्णराव पाटील, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, अरुण जाधव, कृषी विभागाचे सर्व अधिकारी, सरपंच संजीवनी पाटील सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.