Maize Production Agrowon
ॲग्रो गाईड

मका उत्पादकतेत भारत पिछाडीवर का?

जगातील प्रमुख मका उत्पादक देशांची तुलना केली तर उत्पादकतेत भारत खूपच पिछाडीवर आहे.

Team Agrowon

यंदाच्या खरीप हंगामात मक्याकडे अनेक शेतकऱ्यांचा ओढा वाढताना दिसतोय. मक्याला पोल्ट्री (Poultry)आणि स्टार्च (Starch) उद्योगात मोठी मागणी असते. तसेच अनेक ठिकाणी जनावरांच्या वैरणीसाठी चारापीक (Fodder Crop) म्हणूून मक्याची लागवड केली जाते. परंतु देशात मक्याची उत्पादकता खूपच कमी आहे. रोगराईचा प्राुदर्भाव, जनावरांचा त्रास, पाण्याची कमतरता ही मुख्य कारणं आहेत.


जगातील प्रमुख मका Maizeउत्पादक देशांची तुलना केली तर उत्पादकतेत भारत खूपच पिछाडीवर आहे. भारतात कोरडवाहू (Rainfed) मक्याचे प्रमाण जास्त आहे. हे पीक खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बागायती क्षेत्रावर मका लागवड तुलनेने कमी आहे. सिंचनाच्या सुविधा वाढल्या आणि मक्यापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीला प्रोत्साहन मिळालं तर हे चित्र बदलू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

कमी उत्पादकतेची कारणे

  • महाराष्ट्रात प्रामुख्याने खरीप हंगामात कोरडवाहू जमिनीत मक्याची लागवड केली जाते. अनियमित पावसामुळे मक्याचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

  • महाराष्ट्रातील औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, जळगाव आणि कोल्हापूरच्या काही भागात मका पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मक्यासाठी याच भागात मार्केट आहे. विक्रीव्यवस्थेचा अभाव असल्यामुळे इतर भागातील शेतकरी मका पीक घेण्यासाठी जास्त उत्सुक नसतात.

  • जास्त प्रमाणात संकरित वाणाची लागवड होते परंतु त्याप्रमाणे पिकाची योग्य काळजी घेतली जात नाही त्यामुळे उत्पादनात घट येते.

  • मका हे खादाड पीक असल्यामुळे पिकाची अन्नद्रव्याची गरज योग्य वेळी भागवणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच ठिकाणी तसे होताना दिसत नाही.

  • बरेचसे शेतकरी मक्याची लागवड चाऱ्यासाठी करतात त्यामुळे धान्य उत्पादनाच्या दृष्टीने पिकाची अपेक्षित काळजी घेतली जात नाही. रोपातील अंतर योग्य राखले जात नाही. त्यामुळे धान्य उत्पादनावर परिणाम होतो.

  • मक्यावर प्रामुख्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पीकसंरक्षणासाठी वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत तर उत्पादनात मोठी घट येते. एकात्मिक किड नियंत्रण करणे गरजेचे आहे.

  • काही भागातील शेतकऱ्यांचे पीक परिपक्व झाल्यानंतर म्हणजे कणसात दाणे भरल्यानंतर पक्षी, डुक्कर व इतर जनावरे शेतात घुसून पिकाचे मोठे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.

इतर देश भारतापेक्षा पुढे का?

संकरीत व अधिक कालावधीच्या जातींची बागायती लागवड थंड हवामान, जास्त आर्थिक गुंतवणूक, मूल्यवर्धित पदार्थांच्या गरजेनुसार मका उत्पादन तसेच अधुनिक यांत्रिकीकरणामुळे भारतापेक्षा इतर देशांची उत्पादकता जास्त आहे.

उपाययोजना काय हवी?

  • उत्पादकता वाढीसाठी संकरित, उशिरा पक्व होणाऱ्या जातींची लागवड करावी,

  • सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा,.

  • जागतिक पातळीवर मक्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली संधी आहे. मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन मक्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थाची निर्मिती वाढली पाहिजे.

  • औद्योगिक क्षेत्राच्या मागणीप्रमाणे मका उत्पादन घेणे उदा. स्टार्चसाठी नारंगी मका, पोल्ट्री फीडसाठी पिवळा मका, अधिक प्रथिनांसाठी प्रथिनयुक्त मका. त्यामुळे दर जास्त मिळू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT