Farmer Protest: शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Jalsamadhi Andolan: तीन गावांतील असंख्य बाधित शेतकरी कुटुंबीयांनी सोमवारी (ता. ४) सकाळी ११ वाजेपासून सामूहिक जलसमाधी आंदोलनासाठी अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथे गोदावरी नदी पात्रातील पुराच्या पाण्यात उतरत आंदोलन केले.
Farmers Protest
Farmers Protest Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: जायकवाडी धरणाच्या बॅक वाटरचे पाणी असंपादीत शेती पिकात येत असल्याने पिकाची नुकसानभरपाई मिळावी तसेच असंपादित शेतजमिनीची तातडीने संयुक्त मोजणी करून भूसंपादन करण्याच्या मागणीसाठी गंगापूर तालुक्यातील अमळनेर,

लखमापूर आणि गळनिंब या तीन गावांतील असंख्य बाधित शेतकरी कुटुंबीयांनी सोमवारी (ता. ४) सकाळी ११ वाजेपासून सामूहिक जलसमाधी आंदोलनासाठी अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथे गोदावरी नदी पात्रातील पुराच्या पाण्यात उतरत आंदोलन केले.

Farmers Protest
Farmer Protest: कृषी वायदे बाजार मुक्तीसाठी शेतकरी संघटना करणार आंदोलन

संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान सायंकाळी पाच वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे, गंगापूरच्या शाखा अभियंता नेहा धुळे, पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, भूमी अभिलेख कार्यालय गंगापूरचे मुख्य सहायक आप्पासाहेब टोंपे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन समस्या समजून घेतल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com